गर्भगिरी ही डोंगररांग सह्याद्रीची उपशाखा आहे. अत्यंत रम्य असलेले हे डोंगर पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहेत. या ब्लॉगमध्ये डोंगररांगेतील नाथपंथाचे महत्त्व, देवस्थाने, औषधी वनस्पती, ऐतिहासिक महत्त्व, विविध फोटो असे विविध विषयांचा समावेश आहे.
शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९
नगर जिल्ह्याविषयी थोडेसे
नगर जिल्ह्याविषयी थोडेसे
अहमदनगर हे काना ना मात्रा ना वेलांटी ना हुकार असलेलं शहर अनेक बाबतीत आघाडीवर आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी आदी क्षेत्रातही नगर जिल्ह्याचे राज्यात वर्चस्व कायमच राहिले आहे. या जिल्ह्याला मोटी पौराणिक परंपरा आहे. रामायणाच्या काळातील दंडकारण्याचाच हा भाग. त्यामुळे राम, सीता, लक्ष्मणाची ही भूमी म्हणजे वनवासाची भूमी. वशिष्ठ ऋषी, भृंगऋषी, अगस्ती ऋषी अशा महान तपस्वींनी याच भागात तपश्चर्या केली. नवनाथ पंत याच भूमीत जास्त काळ स्थिरावला. अनेकांनी समाध्या घेतल्या. जगप्रसिद्ध ज्ञानेश्वरी या ग्रंथाला याच जिल्ह्याने जन्म दिला. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत साईबाबा, संत दासगणू, संत मेहेरबाबा यासारख्या मोठ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातही जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच आजही राज्याच्या राजकारणाला अनेक वेळा बगल देण्याचे काम याच जिल्ह्यातून होते.अहमदनगर शहर हे जिल्ह्याच्या ठिकाणाचे शहर. ही निजामशाहीची राजधानी होती. 15 व्या शतकाच्या अखेरीस, 1486 मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यानंतर फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी याने 28 मे 1490 रोजी सीना नदीकाठी नगर शहर वसवयाला प्रारंब केला. त्यानंतरच या नगर शहराचे अस्तित्व जाणवू लागले. अहमद निजामशहा मूळचा परभणी जिल्ह्यातील पाथरी गावचा. तेथील तमाभ वल्द बहरू भट याचा तो मुलगा निजामशाही इ. स. 1663 पर्यंत टिकली. या काळात या शहराने अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलतान चांदबिबी यांच्यासारख्या शूर-वीरांची कारकीर्द पाहिली. तसेच गुजरातचा बहादूरशहा आणि अकबरपुत्र मुरादच्या आक्रमणही पाहिले. मुकमिलखान दख्खनी, सलाबतखान, चंगिझकान, मलिकंबर यांच्यासारखे मुत्सद्दी, शहा ताहिरसारखे विद्वान, राजे शहाजी भोसले, कुंवरसेन, संभाजी चिणवीस यांच्यासारखे कर्तबगार हिंदू प्रधान, शाह शरीफ, मिरावलीसारखे साधुपुरुष निजामशाहीच्या काळात होऊन गेले. निजामशहाच्या पडत्या काळात शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला मांडीवर बसवून राज्यकारभार हाती घेतला आणि परकीय आक्रमणापासून हे राज्य वाचविण्याचा प्रयत्न केला. मराठेशाहीची मूहूर्तमेढ याच काळात रोवली गेली. शहाजहान बादशहाने निजामशाहीचा समूळ नाश करून अहमदनगर मोगलांच्या ताब्यात घेतले. "निजाम - उल-मुलूक' याच्या ताब्यात नंतर अहमदनगर आले. जनरल वेलस्ली उर्फ ड्यूक ऑफ विलिंग्टन याने 12 ऑगस्ट 1803 रोजी नगर सिंद्याकडून जिंकले. इंग्रजांचा प्रत्यक्ष अंमल मात्र इ. स. 1818 मध्ये आला. 1942 च्या "चलेजाव' आंदोलनात पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल तसेच राष्ट्रीय नेते नगर किल्ल्याच्या बंदिवासात होते. जगप्रसिद्ध ग्रंथ "डिस्कव्
हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ पंडितजींनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ याच शहरात लिहिला मौलाना आझाद यांचा "गुबारे खातीर' हा ग्रंथही याच भूमीत शब्दबद्ध झाला.
भौगोलिक स्थान ः
पृथ्वीवर नगरचे स्थान रेखांश 10 डिग्री 05 मिनिट ते 10 डिग्री ते 10 मिनिट असे आहे. अक्षांश 70 डिग्री 50 मिनिट असे आहे. नगरची आद्रता साधारणतः 34 ते 81 दिवसा व रात्री 17 ते 34 असते. तापमान कमाल 42 अंश सेल्सिअस,किमान 8 अंश सेल्सिअस असे आहे. नगर शहर हे पुण्यापासून 120,औरंगाबादपासून 120, नाशिकपासून 165, मुंबईपासून 278, कोल्हापूरपासून 360, बीड व सोलापूरपासून 180 कि.मी. अंतरावर आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17,048 चौ. कि.ी. आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 40,88,077 इतकी आहे. तयात पुरुष 21,06,501 तर महिला 19,81,576 असे प्रमाण आहे. म्हणजेच लोकसंख्येची घनता 240 चौ. कि.मी. आहे. त्यात साक्षरतेचे प्रमाण 75.82 टक्के आहे. नगर जिल्ह्यातून गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, कुकडी, घोड, भीमा या नद्या वाहतात. भौगोलिक क्षेत्र 17,02,000 हेक्टर इतके आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
५ टिप्पण्या:
best
नावीन्याच्या शोधात असलेल्या पयर्टकांसाठी आणि अतर अभ्यासकांसाठीही हा ब्लाॅग उपयुक्त ठरणार आहे. अतिशय उपयुक्त आणि दुमिर्ळ माहितीचे हे संकलन आहे. श्री. कराऴे यांना यासाठी शुभेच्छा.
आपले ब्लॉग पाहून मला खूप समाधान झाले.
चला कुणी तरी अतिशय चांगल्या पद्धतीने
आपल्या अहमदनगर शहराबद्दल व्यवस्थित माहितीचे
संकलन केले आहे. आपले कार्य खरेच कौतुकास पात्र आहे.
आपल्या पुढील "पोस्ट" साठी अनेक शुभेच्छा
जहीर सय्यद
निजामशाही इ. स. 1663 पर्यंत टिकली.?
sandrbh konta ?
san 1636 nizamshahi sanpusthar aali.
navnath Wavhal 9881827834
i love this block, really great information
टिप्पणी पोस्ट करा