गर्भगिरी ही डोंगररांग सह्याद्रीची उपशाखा आहे. अत्यंत रम्य असलेले हे डोंगर पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहेत. या ब्लॉगमध्ये डोंगररांगेतील नाथपंथाचे महत्त्व, देवस्थाने, औषधी वनस्पती, ऐतिहासिक महत्त्व, विविध फोटो असे विविध विषयांचा समावेश आहे.
शनिवार, २८ नोव्हेंबर, २००९
नगर जिल्ह्याविषयी थोडेसे
नगर जिल्ह्याविषयी थोडेसे
अहमदनगर हे काना ना मात्रा ना वेलांटी ना हुकार असलेलं शहर अनेक बाबतीत आघाडीवर आहे. राजकारण, समाजकारण, सहकार, कृषी आदी क्षेत्रातही नगर जिल्ह्याचे राज्यात वर्चस्व कायमच राहिले आहे. या जिल्ह्याला मोटी पौराणिक परंपरा आहे. रामायणाच्या काळातील दंडकारण्याचाच हा भाग. त्यामुळे राम, सीता, लक्ष्मणाची ही भूमी म्हणजे वनवासाची भूमी. वशिष्ठ ऋषी, भृंगऋषी, अगस्ती ऋषी अशा महान तपस्वींनी याच भागात तपश्चर्या केली. नवनाथ पंत याच भूमीत जास्त काळ स्थिरावला. अनेकांनी समाध्या घेतल्या. जगप्रसिद्ध ज्ञानेश्वरी या ग्रंथाला याच जिल्ह्याने जन्म दिला. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत साईबाबा, संत दासगणू, संत मेहेरबाबा यासारख्या मोठ्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे.
स्वातंत्र्य संग्रामाच्या काळातही जिल्ह्याचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच आजही राज्याच्या राजकारणाला अनेक वेळा बगल देण्याचे काम याच जिल्ह्यातून होते.अहमदनगर शहर हे जिल्ह्याच्या ठिकाणाचे शहर. ही निजामशाहीची राजधानी होती. 15 व्या शतकाच्या अखेरीस, 1486 मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यानंतर फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी याने 28 मे 1490 रोजी सीना नदीकाठी नगर शहर वसवयाला प्रारंब केला. त्यानंतरच या नगर शहराचे अस्तित्व जाणवू लागले. अहमद निजामशहा मूळचा परभणी जिल्ह्यातील पाथरी गावचा. तेथील तमाभ वल्द बहरू भट याचा तो मुलगा निजामशाही इ. स. 1663 पर्यंत टिकली. या काळात या शहराने अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलतान चांदबिबी यांच्यासारख्या शूर-वीरांची कारकीर्द पाहिली. तसेच गुजरातचा बहादूरशहा आणि अकबरपुत्र मुरादच्या आक्रमणही पाहिले. मुकमिलखान दख्खनी, सलाबतखान, चंगिझकान, मलिकंबर यांच्यासारखे मुत्सद्दी, शहा ताहिरसारखे विद्वान, राजे शहाजी भोसले, कुंवरसेन, संभाजी चिणवीस यांच्यासारखे कर्तबगार हिंदू प्रधान, शाह शरीफ, मिरावलीसारखे साधुपुरुष निजामशाहीच्या काळात होऊन गेले. निजामशहाच्या पडत्या काळात शहाजीराजांनी मूर्तझा निजामशहाला मांडीवर बसवून राज्यकारभार हाती घेतला आणि परकीय आक्रमणापासून हे राज्य वाचविण्याचा प्रयत्न केला. मराठेशाहीची मूहूर्तमेढ याच काळात रोवली गेली. शहाजहान बादशहाने निजामशाहीचा समूळ नाश करून अहमदनगर मोगलांच्या ताब्यात घेतले. "निजाम - उल-मुलूक' याच्या ताब्यात नंतर अहमदनगर आले. जनरल वेलस्ली उर्फ ड्यूक ऑफ विलिंग्टन याने 12 ऑगस्ट 1803 रोजी नगर सिंद्याकडून जिंकले. इंग्रजांचा प्रत्यक्ष अंमल मात्र इ. स. 1818 मध्ये आला. 1942 च्या "चलेजाव' आंदोलनात पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल तसेच राष्ट्रीय नेते नगर किल्ल्याच्या बंदिवासात होते. जगप्रसिद्ध ग्रंथ "डिस्कव्
हरी ऑफ इंडिया' हा ग्रंथ पंडितजींनी याच किल्ल्यात लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "थॉट्स ऑन पाकिस्तान' हा ग्रंथ याच शहरात लिहिला मौलाना आझाद यांचा "गुबारे खातीर' हा ग्रंथही याच भूमीत शब्दबद्ध झाला.
भौगोलिक स्थान ः
पृथ्वीवर नगरचे स्थान रेखांश 10 डिग्री 05 मिनिट ते 10 डिग्री ते 10 मिनिट असे आहे. अक्षांश 70 डिग्री 50 मिनिट असे आहे. नगरची आद्रता साधारणतः 34 ते 81 दिवसा व रात्री 17 ते 34 असते. तापमान कमाल 42 अंश सेल्सिअस,किमान 8 अंश सेल्सिअस असे आहे. नगर शहर हे पुण्यापासून 120,औरंगाबादपासून 120, नाशिकपासून 165, मुंबईपासून 278, कोल्हापूरपासून 360, बीड व सोलापूरपासून 180 कि.मी. अंतरावर आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17,048 चौ. कि.ी. आहे. जिल्ह्याची लोकसंख्या 40,88,077 इतकी आहे. तयात पुरुष 21,06,501 तर महिला 19,81,576 असे प्रमाण आहे. म्हणजेच लोकसंख्येची घनता 240 चौ. कि.मी. आहे. त्यात साक्षरतेचे प्रमाण 75.82 टक्के आहे. नगर जिल्ह्यातून गोदावरी, प्रवरा, मुळा, सीना, कुकडी, घोड, भीमा या नद्या वाहतात. भौगोलिक क्षेत्र 17,02,000 हेक्टर इतके आहे.
शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९
पर्यटकांचे आकर्षण
पर्यटकांचे आकर्षण
सह्याद्री पर्वतरांगेचे पर्यटकांना पूर्वीपासूनच आकर्षण आहे. त्यामुळे अकोले तालुक्यातील कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगड, तसेच विविध स्थाने प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्र डोंगरातील गर्भगिरी डोंगररांग त्यातीलच एक. विविध संत-महात्मे, देव-देवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत पर्यटक कायमच आकर्षिले जातात.
गर्भगिरी डोंगरात अनेक स्थळे निसर्गाची नवलाई दाखविणारे आहेत. अनेक वनस्पती माणसांना जीवन देणाऱ्या आहेत. पावसाळ्यात तर गर्द हिरवाई, डोंगरांनी पांघरलेला हिरवा शालू, त्यावर चमकणाऱ्या फुलरुपी बुनक्या, खळखळ वाहणारे निर्झर, धो-धो करणारे धबधबे, डोंगर उतारावरून झेपावणारे स्वच्छ, नितळ, थंड व गोड पाणी पर्यटकांना कायम खुणावते.
या डोंगररांगेतील ठिकठिकाणचे घाट व त्यातील नागमोडी वळणे घेत जाणारे रस्ते, हे पर्यटकांच्या कॅमेरॅत केव्हाच बंद होतात. वांबोरी घाट, पांढरीपूल, देवगाव घाट, करंजी घाट, चेकेवाडीचा घाट, वृद्धेश्वर घाट, वीरभद्र घाट, महिंदा घाट, येवलवाडीचा घाट, मोहो घाट, मोहरी घाट, तारकेश्वराचा घाट, करोडीचा घाट, कोल्हार घाट, गहिनीनाथ गडाचा घाट या घाटांचा त्यात उल्लेख करावा लागेल. या घाटांत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने गर्द झाडी आहे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगणजवळील गोरक्षनाथगड (ता. नगर) ते बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या गावांपर्यंत सुमारे 160 कि.मी. या रांगेचा पसारा आहे. समुद्रसपाटीपासून गोरक्षनाथ गड 2 हजार 982 फूट उंचीवर आहेत, तसेच आगडगावजवळील डोंगर 3 हजार 192, मढीजवळील डोंगर 2 हजार 922, तर पाथर्डी व त्यापुढील डोंगर साधारणतः 1 हजार 892 फूट उंचीचे आहेत. त्यामुळे येथील वातावरण अधिक विलोभणीय आहे.
पर्यटनस्थळांपैकी डोंगरगण, गोरक्षनाथ गड, चांदबिबी महाल, राडसबा, या स्थळांकडे पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बाळनाथ गड, सातवड डोंगर, ढोलेश्वर, उत्तरेश्वर (करंजी), तारकेश्वर, वडगावचे तुळजाभवानी मंदिर, मानूरचे नागनाथ देवस्थान येथेही पर्यटक भेट देतात. सातवड येथील लेण्याही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. डोंगररांगेतील तलुसलुशीत गवतावर ताव मारणारे हरणांचे कळप, लुटुलुटू पळणारे ससे पाहून अनेकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कापूरवाडी आणि पिंपळगावच्या तलावात रोहित पक्षांचे आगमन झाल्यानंतर हौशी पक्षीप्रेमी तेथे येऊन ठाणच मांडतात, तर मीरावली पहाडावरून अनेकजण पॅराग्लायडिंगचा आनंद घेतात, प्रशिक्षण घेतात. याच डोंगराच्या कुशीत वनभोजनाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण जातात.
पाऊस पडल्यानंतर रौद्र रुप धारण करणारा गुंजाळे (ता. राहुरी) येथील डोंगरातील धबधबा, त्याच परिसरातील बोकडदरीतील धबधबा, चोरगादीजवळील डबके, आगडगावच्या डोंगरातील गिधाडखोरी, जाई (रांजणी) भागातील धबधबा, मायंबाचा धबधबा, बाळनाथ गडाजवळील आनंद दरीतील धबधबा, तारकेश्वर, कोल्हूबाईजवळील धबधबा, अशी अनेक ठिकाणे पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
वृद्धेश्वरच्या डोंगरात, तर श्रावण महिन्यात भक्त व पर्यटकांची मोठी गर्दी होते. तेथील निसर्गाचे सुंदर रुप पाहण्याची अनुभुती पर्यटक अनुभवतात. तशाच निसर्गाच्या छटा येवलवाडी (ता. पाटोदा) येथून डोंगरीकिन्हीकडे जाताना लागणाऱ्या डोंगरात दिसतात. तेथे डोंगर तुटल्यासारखा भासतो. जालिंदरनाथजवळील डोंगरातच असलेल्या तलावात काचेसारखे पाणी चमकताना रस्त्यावरून जाणारा पर्यटक थबकतो.
पशुपक्ष्यांचं माहेरघर ः
गर्भगिरीच्या कुशीत ठिकठिकाणी असलेल्या जिवंत पाणवठ्यांमुळे अनेकविध पशुपक्षी आढळतात. गर्भगिरी डोंगरात असलेल्या विविध वनस्पती, अनुकुल हवामान यामुळे अनेक पक्षी स्थलांतर करून येथे येतात.
या विविध वनस्पतींमुळे आणि ठिकठिकाणी असलेल्या पाणवठ्यांमुळे वन्य पशु-पक्ष्यांचेही ही डोंगररांग माहेरघर आहे. तीनही ऋतुत खाण्यास फळे-फुले, भेटत असल्याने चिमण्या, कावळे, गिधाडे, साळुंक्या, सुतार, पोपट, कोकिळा, पारवा, करकोचा, बगळा, रोहित पक्षी, कोळसा, वटवाघूळ, पावश्या , मोर, लांडोर, घुबड, टिटवी, घार, ससाणा आदी पक्षी हमखास भरारी घेताना दिसतात. कोतवाल, माळटिटवी, काक्षी, बुलबुल, शिंपी, कोकीळ आदी पक्ष्यांचा चिवचिवाट कायम ऐकू येतो.
हिवाळ्यातही स्थलांतरित शेकाट्या, पांढरा धोबी, ब्राह्मणी बदक, पिंटेल बदक, चमचा, काळा सराटी, कांडे करकोचे आदी पक्ष्यांची गर्दी होते.
युरोपमधून बोरड्या हजारोंच्या थव्यांनी येथे येतात. त्यांच्या हवाई कसरती विसेष प्रेक्षणीय असतात. ज्वारीच्या हुरड्याच्या दिवसात तो मटकाविण्यासाठी येणाऱ्या मुनिया पक्ष्यांचे थवेही येथे आढळतात.
पिंपळगाव माळवी तलावावर माळढोक (ब्लॅक स्टोर्क) व पांढरा करकोचा हे दुर्मिळ पक्षीही दिसून आले होते.
खाण्यास विविध अन्न मिळत असल्याने वन्य प्राणी चिंकारा, काळवीट, लांडगे, कोल्हे, रानमांजरी, तरस, खोकड, ससे आदी वावरताना दिसतात, तर घोरपड, साप, सापसुरुळी, सरडा, घोयऱ्या सरड, पाल आदी सरपटणारे प्राणीही आढळतात.
या सर्व पशुपक्ष्यांना बाराही महिने पाणी असलेले पाणवठे जीवन देतात. मांजरसुंबा डोंगरातील टाके, गुंजाळे शिवारातील मावलायाचे निसर्गनिर्मित रांजणखळगे, सिनाशंकर (ससेवाडी), वाघजाई, भैरवनाथ तलाव (आगडगाव), जाईची धार (रांजणी), आनंददरी (करंजी), वृद्धेश्वर (ता. पाथर्डी), नागनाथजवळील डोंगरदरी, जानपीर तलाव (ता. पाटोदा) येथील पानवठे वर्षानुवर्षे या रानपाखरे, वन्य पसुपक्ष्यांना पाणी देत आहेत. त्यामुळे डोंगरात कायम पशुपक्ष्यांचे आवाज, किलबिलाट अनुभवता येतो.
अंधारात या डोंगररांगेत फेरफटका मारला, तर प्राण्यांचे चमकणारे डोळे, दऱ्या खोऱ्यांतून चमकणारे काजवे, रातकिड्यांचे आवाज माणसाला भुरळ घालतात, तर कोल्ह्यांची कोल्हेकुई कायम चालूच असते.
"प्रतिमहाबळेश्वर'
गर्भगिरी डोंगररांगेत योग्य नियोजन, पाणलोट क्षेत्र विकासकामे, पर्यटन विकास झाल्यास ही डोंगररांग महाराष्ट्राची "दुभती गाय' होऊ शकेल. प्रतिमहाबळेश्वर म्हणून या भागाकडे पाहिले जाईल.
गर्भगिरी शब्दाचा अर्थ होतो, गर्भ म्हणजे मध्यभाग व गिरी म्हणजे पर्वत. या डोंगरांच्या बाजूला सुमारे 100 ते 300 किलोमीटरपर्यंत दुसरे डोंगर नाहीत. उत्तरेकडील भागात गोदावरी खोरे, तर दक्षिणेकडील भागात कृष्णा खोरे आहे. डोंगरावर पडलेल्या पावसाचे निम्मे पाणी गोदावरी खोऱ्यात, तर निम्मे कृष्णा खोऱ्यात जाते. या पाण्याचा प्रत्यक्ष लाभ गर्भगिरीतील ग्रामस्थांनाच नव्हे, तर या दोन्ही खोऱ्यांतील लोकांना होतो. पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, शिक्षणापासून दूर, पारंपारिक पद्धतीने शेती आदींमुळे या पट्ट्यातील लोकांची सुधारणा वेगाने होऊ शकत नाही. औषधी वनस्पतींचा खजिना असूनही अज्ञानामुळे त्याचा वापर होत नाही, ही शोकांतिका आहे.
या भागातील पाथर्डी, आष्टी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार उपजिविकेसाठी इतरत्र जातात. माणिकदौंडी भागातील लोकांकडे कोळसा कामगार म्हणून पाहिले जाते, तर इतर भागातील लोक शेतमजूर आहे.
जगाच्या नकाशावर या डोंगररांगेचे स्थान साधारणतः अक्षांश उत्तर 18 डिग्री 20 मिनिटे ते 19 डिग्री 59 मिनिट असे आहे, तर रेखांश पूर्व 73 डिग्री 40 मिनिट ते 75 डिग्री 43 मिनिटे या दरम्यान आहे. या पट्ट्यातील हवामान चांगले असते.
या भागात साधारणतः कमाल 42 अंश सेल्सिअस व किमान आठ अंश सेल्सिअस तापमान असते, तर आर्द्रता 34 ते 81 टक्के दिवसा आणि रात्री 17 ते 24 टक्के इतकी असते. त्यामुळे पिके, आरोग्य, वनस्पतींना हे वातावरण चांगले आहे. या निसर्गनिर्मित बाबींचा लाभ घेऊन या भागाचा विकास चांगला होऊ शकतो. या डोंगरात पडणारे पाणी अडवून ते जिरविल्यास किंवा त्याचा साठा मोठ्या प्रमाणात केल्यास त्या भागातील लोकांना त्याचा चांगला फायदा होऊ शकेल. शिवाय पर्यटनासाठी ही डोंगररांग महाराष्ट्राला खुणावेल. पर्यटनवाढीमुळे ग्रामस्थांनाही उपजिविकेचे साधन वाढू शकेल.
जलसंधारण ः
डोंगरी भागात वन खाते, कृषी खाते, वॉटर, इंडो-जर्मन, नाबार्ड, तसेच इतर पाणलोट विकास संस्थांनी यापूर्वी विविध कामे केली असली, तरी ती तोडकी आहेत. प्रत्येक डोंगरावर चर खोदून पाणी अडविणे गरजेचे आहे. तसेच वृक्षारोपणाची व्यापक मोहीम घेणे गरजेचे आहे. डोंगरात असलेल्या मोठमोठ्या नाली सिमेंट बंधाऱ्याने अडविल्यास पठारावरील व डोंगरातील पाणी डोंगरातच जिरेल. त्याचा फायदा विहिरींना व वनस्पतींच्या वाढीसाठी होईल. डोंगरांच्या पायथ्याला असलेल्या भू-भागाचा वापर शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे प्रत्येक ऐकरमध्ये किमान दोन गुंठे आकाराचे शेततळे झाल्यास पाणीसाठवण मोठे होऊ शकेल.
डोंगरावर पडलेले पाणी बंधारे, शेततळी आदींच्या माध्यमातून अडविले गेले पाहिजे. आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, भू-जलतज्ज्ञ प्रा.डॉ. बी. एन. शिंदे यांनीही या भागाच्या विकासाबाबत अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत.
आयुर्वेद संशोधन ः
या डोंगरात असलेल्या विविध औषधी वनस्पतींचे संशोधन होऊन त्यांची चांगल्या प्रकारे ओळख होणे गरजेचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर संशोधन व्हावे. सरकारने हा डोंगर संरक्षित करून त्याचा विकास केला, तर हे शक्य आहे. आयुर्वेद वनस्पतींवर संशोधनासाठी शासनाने संशोधकांना मानधन देऊन या कार्याला चालना द्यावी, से झाल्यास या वनस्पती जागतिक बाजारपेठेतसुद्धा जाऊ शकतील. वनस्पतींचे व्यावसायिकीकरण झाल्यास करोडो रुपयांचे उत्पन्न हे डोंगर मिळवून देऊ शकतील.
पर्यटन विकास ः
या डोंगररांगेत विविध पर्यटनस्थळे आहेत; परंतु पर्यटकांना त्यांची विशेष माहिती नसल्याने ते दुर्लक्षित राहिल आहेत. त्यासाठी प्रत्येक पठारी भागातून आणि डोंगराच्या महत्त्वाच्या भागातून रस्ते होणे गरजेचे आहे. शहरातील अनेकांना आठवड्यातून एक दिवस तरी ग्रामीण भागात, शुद्ध हवेत, निसर्गाच्या सानिध्यात राहू इच्छिणाऱ्यांची सोय होऊ शकेल. त्यासाठी शासनानेच ठिकठिकाणी विश्रामगृहे तयार केल्यास कमी खर्चात हा आनंद मिळविता येईल. गिरिभ्रमण करणारे, औषधी वनस्पतींचा अभ्यास करणारे, तसेच पर्यटकांना या विश्रामगृहांचा फायदा होऊ शकेल. पर्यायाने हॉटेल व्यवसाय वाढीस लागून स्थानिक लोकांना रोजगार मिळू शकेल.
दुग्धव्यवसायास चालना ः
डोंगरी पट्ट्यात चांगली जमीन योग्य हवामानामुळे दुग्धव्यवसाय चांगला चालू शकतो. या डोंगरातील पौष्टिक चाऱ्यामुळे "कमी चाऱ्यावर दूध' अशी उक्ती प्रचलित झाली आहे. शहराजवळील किंवा बागायती पट्ट्यातील जनावरांना मिळणारा चारा हा विविध रासायनिक खतांचा मारा करून तयार केलेला असतो. त्यामुळे त्यांच्या दुधातही त्याचे अंश उतरू शकतात; परंतु डोंगरी गाई-म्हशींना मिळणारा चारा हा डोंगरातील गवत, कडबा, डोंगरातील विविध वनस्पती अशा स्वरुपात मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे येथील जनावरांपासून मिळणारे दूध अधिक चांगले समजले जाते. या व्यवसायास अनुकूल परिस्थितीमुळे शासनाने दुग्धव्यवसायाला चालना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना कमी व्याजात कर्ज देऊन हा व्यवसाय वाढविता येऊ शकेल.
पवनऊर्जा ः
पवनऊर्जेसाठी लागणारे अनुकूल हवामान या डोंगरांवर आहे. त्यामुळे पवनऊर्जेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. ते पर्यटनाच्या दृष्टीनेही उपयुक्त होत आहेत.
शैक्षणिक विकास ः
शिक्षण हा विकासाचा आत्मा असतो. त्यामुळे डोंगरपट्ट्यातील मुलांना चांगले शिक्षण दिले, तर ते या भागाचा विकास अधिक करू शकतील. आधुनिक पद्धतीने शेती होऊन त्यांच्या राहणीमानामध्ये त्या फायदा होऊ शकेल.
गर्भगिरीच्या विकासासाठी विविध संत-महात्मे, राजकारणी मंडळींच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. गर्भगिरीच्या डोंगरांत वनौषधींमुळे नाथ संप्रदाय स्थिरावला. आताही विविध साधूसंत आपल्या कर्तृत्वाने समाजप्रबोधन करीत आहेत. या भागाच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. वृद्धेश्वर देवस्थान येथीलविजयनाथ बाबा आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. धार्मिक प्रबोधन त्यांच्यामुळे होते. शहा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शहापूरचे दत्त दिगंबर महाराज हे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. परिसराच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन असते.
सातवड (ता. पाथर्डी) येथील ज्ञानानंद महाराजांनी त्या परिसरातील निसर्ग फुलविला आहे. ग्रामस्थांना धार्मिक बळ देऊन व्यसनमुक्तीचे महान कार्य करणारे ज्ञानेश्वर माऊली कराळे हे करंजीच्या घाटातील मठात असतात. राष्ट्रसंत (कै.) कुशाबा महाराज तनपुरे यांनी 1972 मधील दुष्काळात अन्नदानाच्या माध्यमातून गावे जगविली. गहिनीनाथ गडावरील (कै.) संत वामनभाऊ यांनी पशुहत्याबंदीसाठी मोलाची कामगिरी केली. भृंगऋषी दऱ्यातील शेंगदाणेबाबा, तसेच ज्ञानेश्वरी मुखोद्गत असलेले , वारकरी संप्रदायाला गती देणारे व ज्ञानेश्वरीचे तत्वज्ञान सांगणारे मुकुंदकाका जाटदेवळेकर, प्राचीन वारसा जपणारे व शिव उपासक नागनाथ देवस्थानजवळील गुरु विरुपाक्ष स्वामी महाराज आदींचे या डोंगररांगेसाठी महत्त्वाचे योगदान आहे. करंजी, मोहटा परिसर, पाटोदा तालुका, शिरुर कासार तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विविध ठिकाणी हायस्कूल सुरू आहेत. त्यामुळे येथील मुलांना शिक्षण मिळत आहे. गर्भगिरी रांगेतील विविध पर्यटनस्थळांना "क' वर्ग दर्जा मिळू लागला आहे. अशाच प्रकारचा दर्जा गर्भगिरीतील इतर संस्थांना मिळणे गरजेचे आहे. या भागातील संपूर्ण रस्ते डांबरी होणे गरजेचे आहे, तसेच ग्रुप ग्रामपंचायतीऐवजी सर्व गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा. सध्या वाहतुकीची वर्दळ नसल्याने चांगले रस्ते नाहीत व रस्ते चांगले नसल्याने वाहतूक नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यासाठी रस्ते चांगले होणे आवश्यक आहे. विकास निधी वापरताना हा निधी इतरत्र न वळविता डोंगरी विकासासाठीच वापरला गेला पाहिजे.
हे काम झाले, तर खऱ्या अर्थाने गांधीजींचे "खेड्याकडे चला' हे स्वप्न साकार होऊ शकेल."वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती' या ओवीनुसार वृक्ष हेच आपले पिढ्यान् पिढ्यांसाठी सगे सोयरे आहेत. त्यांची जपवणूक केल्यास ते आपली जपवणूक करतील. या डोंगरात वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. ज्ञानोबा - तुकोबांचा वारसा सांगणाऱ्या उपासकांनी या ओवीचा अर्थ आचरणात आणण्याची खरी गरज आहे.
दुर्मिळ औषधींचे आगार
दुर्मिळ औषधींचे आगार
गर्भगिरी पर्वतरांग हे औषधी वनस्पतींचे माहेरघरच आहे. दुर्मिळ वनौषधींचे ते मोठे आगार आहे. वेगवेगळ्या वनस्पतींनी नटलेले हे डोंगर नगर व बीड जिल्ह्यांचे भूषण आहेत.
सर्व वनस्पतींचे ज्ञान नवनाथांना होते. त्याचा उपयोगही त्यांना माहिती होता. या डोंगररांगेत अशा बहुगुणी वनस्पती सापडल्यामुळे नवनाथांचे वास्तव्य या भागात दीर्घकाळ होते. विविध वन्य पशू-पक्ष्यांचाही यामुळेच या डोंगरात वावर असतो.
गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते येवलवाडी (ता. पाटोदा) दरम्यान या डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. अर्थात या खजिन्याची चावी जुन्या जाणकार व ठराविक व्यक्तींनाच सापडलेली असल्याने, विविध आजारांवर आयुर्वेदिक औषधे देणारी अनेक मंडळी सापडतात. त्यांच्या औषधांनी आजारांवर गुणही येतो. साधी ठेच लागून जखम झाली, तर कोठेही सहज उपलब्ध होणारी "टनटनी' ही वनस्पती चोळून जखमेला "राम राम'ने ठोकणारी मंडळी कमी नाहीत, तर गजकर्ण किंवा इसबगोल यासारख्या जखमा हमखास बरे करणारी औषधी देणारी मंडळीही आहेत. बहुतेक ग्रामस्थ अनेक आजारांवर गावरान उपाय करून वेळ व पैसा वाचवितात. या डोंगरपट्ट्यातील शहा डोंगर, मांजरसुंभे, बिन्नी डोंगर, धुमाळ्या डोंगर, वाळूक टेंभा, खांडी, वाघजाई, देवदरा, पाची पोरांचे डोंगर, वृद्धेश्वर, बोकडदरा, सावरगाव डोंगर परिसर, पत्र्याचा तांडा (सावरगाव), आंबेवाडीचा डोंगर, येवलवाडी आदी डोंगरांत औषधी वनस्पती खच्चून भरलेल्या आहेत. शिरुर कासार (जि. बीड) तालुक्यातील मानूरच्या नागनाथ देवस्थानजवळ, तर गोरख चिंचेचा विशाल वृक्ष आहे. ही चिंच अत्यंत दुर्मिळ व अनेक आजारांवर उपाय करणारी आहे. मुसळी, शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, सोनतरवड, अर्जुनवेल, गुळवेल, अमृतवेल, बेल, भुईसल, चंदन, खैर, बाभूळ, अमोनी, निरधामना, हेकुळी, धावडा, वड, लिंब, घेटुळी, चिंच, सापकांदा, रानकांदा, चिबूकाटा, सराटा, रिंगणी, काटेरी रिंगणी, साबर, तरवड, रुई, तांदुळचा, धोत्रा, निंब, तुळस, रानतुळस, पानकनीस, आपाटा, एरंडी, तेलतुकडी, महादूत, निवडुंग, मेडसिंग, पाचुंदा, केकताड, दुधी, गुग्गुळ, निलगिरी, गुलमोहोर, घाणेरी, बांबू, रानमटकी, उंबर, बिबवा, महाडूक, सौंदड, अर्जुनसाल, उंबर, पिंपळ, सागर, पाथरी, पांगारा, सिंद, चिल्हर, सिसम, लोखंडी, पांढरी, रिठा, रामफळ, पळस, बहावा, निमोणी, हिवर, खिरणी, कोरफड, चिकणी, घायपती, साजरगोंडा, दवणा आदी औषधी वनस्पत
ी सर्रास आढळतात. डोंगरात चंदनाची झाडे सापडत असल्याने अनेक चंदनतस्करांची उपजीविका गर्भगिरीवर चालते. जांभूळ, आंबा, पेरू, डाळिंब, संत्री, मोसंबी, पोपई, सीताफळ आदी फळांनी बागा बहरतात.
टेंभुर्णी, बोरे, खरमटे, कांगोण्या, जांभूळ, करवंद, निवडुंग, पिठावण्या, हामनं, खिरण्या, शेवंत्या, रानमटकी, धामण्या, तांबोरी आदी रानमेवा, तर येथील ग्रामस्थांना सहज उपलब्ध होणारा असतो. जाई-जुई, झेंडू, मोगरा जास्वंदी, शेवंती आदी सुगंधी फुलांनी डोंगर बहरतात. आनंददरी (बाळनाथ गड), वाघजाई हे डोंगर म्हणजे करवंदांची खाणच म्हणावी लागेल. शहा डोंगरावर खिरण्यांची अनेक झाडे आहेत.
गवताच्या विविधजाती येथे आहेत. त्यात कन्हेर, पवना, कुंदा, कुसळी, हरळ, शिपरुट, पाथरी, दुधावणी, कोंबडा, कुसमुड, तांदुळचा, कुंजीरचा, दिवाळी, लालडोंगा, मोळ, पानकनीस, राजहंस आदींचा समावेश आहे. प्रत्येक मोसमात या गर्भगिरीच्या झोळीत निसर्ग ही फळे - फुले भरभरून दान करतो. त्यामुळेच मधमाश्या, कीटक येथे मकरंद गोळा करण्यासाठी कायम घोंगावताना दिसतात. वांबोरी घाट, उदरमल घाट, पाची पोरांचे डोंगर, आनंद दरी, वाघदरी, आष्टी तालुक्यातील घाट, देऊळगावजवळील डोंगर, पाटोदा तालुक्यातील डोंगराचा भाग या भागात आगे, ब्राह्मणी, साधे मोहोळ मोठ्या प्रमाणात सापडतात. त्यामुळेच गोड मधाचे आगार म्हणून या गर्भगिरीकडे पाहिले जाते.
या भागात खरिपात बाजरी, वाटाणा, मूग, सूर्यफूल, तर रब्बीत ज्वारी, गहू आदी पिके घेतली जातात. करडई, सोयाबीन, सूर्यफूल, शेंगदाणे आदींचे तेल पाडून शेतकरी घरगुती वापर करतात. पुणे येथील रसशाळेचे अभ्यासक या डोंगररांगेत विविध वनस्पतींचा अभ्यास करीत असतात.
उन्हाळी (विंचू उतरतो), पांढरी गुंज (अर्धशिशीला गुणकारी), काळे तीळ (मूळव्याधीसाठी उपयुक्त), कळलावी, धामसी, कडू दोडका, पडवळ, पादरवासी, निरगुडी, बहावा, मेडसिंग, सौंदड, वांज, करटुली, गुंज या वनस्पतींबरोबर बकान, पांढरी घोसळी, जायफळ, तांबडी जाई, टाखळ, पळस, हिरडा, मुळा, मूग मोरचूद, तोंडली, ब्रह्मदंडी, उटकटार, केवडा आदी वनस्पती त्या-त्या हंगामांमध्ये आढळतात.
उपयुक्त ठरणारी नाई ही दुर्मिळ वनस्पती या डोंगरात मोठ्या प्रमाणात सापडते. पांढरी अपमारी व नाई या दोन वनस्पतींपासून मधुमेहावर उपचार केले जातात, तसेच मधुनाशिनी ही वनस्पतीही मधुमेहावर उपचार करण्यासाठी वापरतात. नारळाची कवटी व टनटनी, तसेच इतर वनस्पतींपासून इसब या आजारावर औषध तयार होते.
चित्रक (मूळव्याध व इतर आजारांवर), धायटी, अडुळसा (कफ पातळ करण्यासाठी), बावच्याचे पीट (कोडासाठी उपयुक्त), रान भुईतरवड (पोटाच्या विकारांसाठी), सोनामुखी, हरणखुरी (उष्णतारोधक असते. हरणांच्या आवडीची वनस्पती), करटुली (फिट्ससाठी), पांढरी जादी (स्त्रीरोग), ज्येष्ठमध (मूळव्याधीसाठी), देवडांगरी (मोड मूळव्याधीसाठी), तालीम खाना (धातुपौष्टिक) आदी विविध आजारांवर उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या वनस्पती या डोंगरात आहेत. तोंड आल्यास जाईचा पाला चावला, तर ते गुणकारी ठरते. जाई ही वनस्पती जाईच्या डोंगरात मोठ्या प्रमाणात आहे. अर्जुन सादाड या वनस्पतीची साल हाडाला लागलेल्या मार व शरिरावरील जखमांवर गुणकारी असते.
डोंगरातील या वनस्पतींचा उपयोग करून काही ठिकाणी उद्यान सुरू केले आहेत. प्रत्येक घराच्या आवारात किमान महत्त्वाच्या दहा वनस्पती असाव्यात, यामुळे किरकोळ आजारासाठी डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.
"बाई मी लाजाळू गं लाजाळू' या गाण्याच्या ओळी फक्त व्यक्तीपुरत्याच मर्यादित नाही, तर त्याला अपवाद आहे "वाघजाईचा डोंगर' नगर तालुक्यात असलेल्या या डोंगरात लाजाळूची असंख्य झाडे आहेत. त्याला हात लावला, की ही वनस्पती आपली पाने मिटवून घेते व लाजते.
आपण डोंगरातून फिरताना अनेक मौल्यवान वनस्पती पायाखाली तुडवून जातो, पण त्यांची ओळख झाल्यास त्याचे महत्त्व अधिक कळते. या गर्भगिरीत अशाच असंख्य वनस्पती जाणकारांना खुणावतात.
गोरक्षनाथांनी पूर्ण गर्भगिरी सोन्याचा केला, असा उल्लेख पोथी-पुराणांत आहे. सध्याही या औषधी वनस्पतींचा विचार केला, तर या डोंगराचे मोल सोन्यापेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल.

गर्भगिरीतील गाणी
गर्भगिरीतील गाणी
ड मोरी गाय ड येल रं ड येली
ड मोरी गायीचा ड गोऱ्हा रं ड गोऱ्हा
ड गोऱ्याला मोडलाय ड काटा रं ड काटा
ड काट्या कुट्याचा ड येळू रं ड येळू
ही काव्य रचना अर्थात कुणा मोठ्या नावाजलेल्या, पारितोषिके मिळविलेल्या कविने केली नाही, तर रोज गुरे सांभाळणाऱ्या गुराख्याची आहे. आपल्या लाडक्या गायीसमोर दीपावलीच्या आगोदर गो-बारशीला हे काव्य गायीले जाते. गो-बारशीला गुराख्यातील कवी, गायक जागा होतो. आपल्या जशा असेल, तशा स्वरात हे कवन तो करतो. वरील गाण्यात मोरी नावाची गाय व्याली आहे. तिला गोऱ्हा झालाय. हा गोऱ्हा खेळत असताना त्याला काटा मोडलाय. अशा या काट्याकुट्याच्या वेळूजवळच गाया खेळू लागल्या आहेत. पण या खेळात फांद्या फोडणारा नांद्या बैल डरतो आहे. अशा अर्थाने तो आपल्या लाडक्या गायीचं, गायांच्या खेळाचं वर्ण करतो. पुढे निळ्या गोडीवर बसन, निळ्या घोडीचा खरा, राघू मारतो भरारी आणि त्याची किंकाळी ही वरील खेळापासून अलिप्त वाटत असले, तरी गाण्याची लकब त्यामुळे अधिक स्पष्ट होते. त्यात "ड' हे अक्षर फक्त यमक जुळवून तालासाठी वापरले आहे, असे दिसते.
याच गाण्याला "ड' च्या ऐवजी "कान्हूबा' हा शब्द वापरण्याची पद्धत आहे. पण त्याची चाल थोडी वेगळी आहे. "कान्हूबा' म्हणजे कानिफनाथ. कानिफनाथ हे गर्भगिरीतील महत्त्वाचे देवस्थान. कदाचित कानिफनाथांना आपल्या गायीचं वर्णन हे गुराखी सांगत असतील. म्हणजेच ही गाणी याच परिसरातली लोकांनी रचली, असे वाटते. त्या गाण्याचे बोल असे आहेत ः
गाय येली (व्याली) कान्हुबा रं मोरी गाय येली..
झालाय गोऱ्हा कान्हूबा रं मोरीला झालाय गोऱ्हा
गोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा कान्हूबा रं गोऱ्ह्याच्या गळ्यात गेठा
गेठ्याला मोडलाय काटा कान्हूबा रं गेठ्याला मोडलाय काटा
अशा प्रकारे हे गाणं वेगळ्या चालीने, पद्धतीने गायलं जातं. गुराख्याची दीपावलीच्या वेळी गायांसमोर म्हणण्याची ही गाणी गर्भगिरीच्या कुशीत कायम म्हटले जातात. सध्या त्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी जुन्या पद्धती सांभाळणारी मंडळी आहेत. त्या त्या गोठ्यात अजूही हे स्वर गुंजतात.
गुराख्यासाठी गाय ही खऱ्या अर्थाने माय असते. दिवसभर तो या गाया सांभाळण्याच्या निमित्ताने गायांसोबतच असतो. आणि रात्रीही गोठा सांभाळण्याची, धारा काढण्यासाठी त्याची ड्यूटी गोठ्यातच असते. कारण गायांच्या गोठ्यात रात्री एखादा तरी व्यक्ती असावाच लागतो. रात्री गाय, बैल सुटला, तर इतर जणावरांना मारतो किंवा वैरणीची नासाडी करतो, म्हणून रात्रीही तेथे माणसांची गरज असते. अर्थात हे काम या गुराख्यावरच येते. म्हणूनच गुराखी आपल्या जनावरांसी एकरूप झालेला असतो. जनावरेही त्याचा आवाज ऐकल्याबरोबर हंबरतात. वासरे गायांना पाजण्यासाठी हा गुराखीच सोडतो. त्यामुळे तो गोठ्यात आला, की वासरे हंबरतात. गायाही एकप्रकारे त्याला हाकाच मारतात. त्यामुळेच गुराख्याचं गायीविषयी अधिक प्रेम असते. हे प्रेम तो आपल्या शब्दात व्यक्त करतो. गायीचं सुरेख वर्णण तो गाण्यातून करतो.
झ्या बहुळन गायीचे पोट न
झ्या बहुळन गायीचे पोट
त्यात बसलेत देव 33 कोट रं गाय
पंढरी का बहुळन बरी
बरी गाय बरी देव मन भरी
दुध भरून देती चरी रे गाय बहुळी
या गाण्यातून तो आपल्या गायीचं वर्णन करतो. त्या गायीचं नाव बहुळन. तिच्या पोटात 33 कोटी देव बसलेत. अशाच प्रकारे गायींच्या प्रतेयक अवयवांना तो उपमा देतो. बहुळन गायीची पाठ म्हणजे सोलापूराची (सरळ आणि सपाट) वाट आहे. गायीचे शिंगे म्हणजे महादेवाची लिंगे आहेत. गायीचे कान म्हणजेच नागिणीचे तजेलदार पाणं आहेत. गायीचे डोळे म्हणजे लोण्याचे गोळे आहेत. गायीची कास म्हणजे तांदळाची रास, अशा प्रकारे तो वर्णन करतो आणि हे गाणं असंच लांबत जातं. दुसरं एक गमतीशीर गाणं या वेळी गायलं जातं.
झ्या मळ्यातून जाय रे गोपाळा तुझ्या मळ्यातून जाय रे
जाऊन जाय तिरगून जाय आकाशी पिरतंय काय रे गोपाळा
सांगून दी तव्हा जाय रे ...
एक गोपाळ (गुराखी) दुसऱ्या गोपाळाला म्हणतो. तुझ्या मळ्यातून जात असताना माझ्याही मळ्यातून जाय. आणि तेथे काय चाललंय ते बघ. सर्व काही ठिकठाक आहे ना हे बघ. तुझ्या मळ्यातून चाललाच आहेत, तर थोडा तिरगून (तसंच पुढं) माझ्याही मळ्याकडं जाय आणि या मळ्याच्या आकाशी काय फिरतंय, म्हणजेच त्या परिसरात काय काय फिरतंय ते पहा.
वरील एक कडवं गुराखी म्हणतो. दुसरा लगेच त्याला उत्तर देतो. अर्थात तेही काव्यात्मकच. दुसरा गुराखी म्हणतो...
झ्या गड्याचा हार गोपाळा रे तुझ्या गड्याचा हार
हारावर हार तिरगुण हार आकाशी फिरतीय घार गोपाळा रे
सांगन दिलं मी जातो...
अशी सुंदर उपमा देऊन तो आकाशी घार फिरत असल्याचं सांगतो. हे गाणं असंच पुढं कितीही वाढत जातं. आकाशी टिटवी फिरत आहे. हे सांगताना त्याला यमक जुळविण्यासाठी ईटीचा (विटू दांडूतील विटी)वापर होतो.
जात्यावरील ओव्या ः
पिठाच्या गिरण्या आल्यापासून जाते हे आता फक्त नावापुरतेच उरू पाहत आहे. असे असले, तरी गर्भगिरीच्या कुशीतील अनेक गावांत वीज गेल्यानंतर घराघरातून जात्यावरील ओव्या (गाणी) घुमू लागतात. पूर्वी ग्रामीण भागात वीज नव्हती. त्यामुळे वीजेवरील पिठाच्या गिरण्या नव्हत्या. डिझेलच्या गिरण्याही अगदीच नाममात्र होत्या. चार-पाच गावांमिळून एकादी गिरणी असे. त्यामुळे इतर गावांतील लोक आठ-दहा किलोमीटरहून बैलगाड्यांत धान्य टाकून दळण्यासाठी आणत असे. साधारणतः 1970 च्या दरम्यान मोठ्या खेड्यात डिझेलच्या गिरण्या आल्या. तत्पूर्वी जात्याचाच वापर पीठ दळण्यासाठी होत असे.
हिला रोज पहाटे उठून प्रथम धान्य दळणाचे काम करीत. जाते हे दगडाचे असे. साधारतः एका किंवा दोन तासात पायलीभर धान्य होत असे. त्यानिमित्ताने महिलांना मात्र चांगलाच व्यायामही होत होता. आता हे जाते फक्त लग्नात हळद दळण्यासाठीच वापरले जाते.
पहाटे अशा प्रकारचे दळण दळत असताना विशिष्ट पद्धतीने गाणी म्हटले जात. त्यास जात्यावरील ओव्या म्हणत. आजही ही गाणी गर्भगिरीच्या कुशीत जीवंत आहेत. या ओव्या ऐकण्यास मिळतात.
या गाण्यांतून प्रामुख्याने देवाचे वर्णन, आपल्या मुला-मुलींचं किंवा धन्याचं (पतीचे) वर्णन केले जाते. शक्यतो दोघीजणी हे जाते चालवतात आणि गाणी म्हणतात. असेच मारूतीचे (हनुमान) गाणी ऐकण्यास मिळते.
राया तुझे धरीते रे पायी
आधी कर माझी सोई मंग आंघोळीला जाई
राया तुझं धरीते रे बोट
आधी कर माझी सोई मंग आंगोळीला उठ
राया तुझं धरीते धोतर
आधी कर माजी सोई मंग पायरी उतर
राया शेंडी तुझी शेंदराची
झलक्या मारीती वर फांदी लिंबोळ्याची
राया पोरामंदी खेळू नको
शेंदरी लाल झगा माती मंदी लोळू नको
ऐटीमंदी उभा कोण रांगड्या पायाचं
राजा पुत्र अंजणाबाईचा
वेशच्या बाहेरी बंगला 22 खांबाचा
राया शिष्या नांदतो नेमाचा
या गाण्यातून मारूतीरायाला विनंती करण्यात येत आहे. तुझे पाय धरीते, आधी माजी सोय कर. मगच आंघोळीला जाय. आधी माझी सोय कर, तरच पायरी उतर. अशा प्रकारचे अनेक गाण्यांतन विविध वर्णन केलेले आढळते.
अशाच पद्धतीने रामायणातील काही प्रसंगी जात्यावरील ओव्यातून बसविलेले आहेत. सिताबाईचं गाणं हे तितकेच प्रसिद्ध आहे.
अरण्या वणात कोण रडत ऐका
सीताबाई बाळांतीन बोरी बाभळी बायका
अरण्या वणात काय दिसं लाल लाल
सिताबाई बाळांतीन दिलं लुगड्याचं पाल
अरण्या वणात म्हणजे दंडकारण्य. या वणात कोण रडतं ऐका. तर सिताबाई बाळांत झालेली आहे. तिला जोडी कोण, तर बोरी, बाभळी ही झाडे. याच वणात काय लाल लाल दिसतं. तर तिसाबाईला लुगड्याचं पाल दिलेलं आहे. तेच लाल लाल दिसत आहे. असे या गाण्यातून म्हटले आहे. म्हणजेच माता सितेच्या विविध प्रसंगांचं वर्णण अशा ओव्यातून केलेले दिसचे. या ओव्या कोणी रचल्या, हे सांगता येणं कठिण आहे. मात्र एक पुस्तकही न शिकलेल्या महिलांनी हे गाणं रचलं आणि ते पुढे आईकडून मुलीला असे आतापर्यंत येत आहे, हे मात्र खरे.
जात्यावर दळणासाठी बसल्यानंतर ओव्या म्हणत असताना भरपूर काम झाले, तरी थकवा येत नसे. तुळशीविषयी प्रेम व्यक्त करताना एका ओवीतून अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे.
तुळशीबाई नको हिंडू जंगलात
पैस माझा वाडा जागा देते अंगणात
तुळशीबाई नको हिंडू रानी वनी
पैस माझा वाडा जागा देते इंद्रवणी
तुळशीच्या माळा पैशाला वीस-तीस
पुरना माझा हात विठ्ठला खाली बस
तुळशीचा पाला वारा सैतानाने नेला
देव विठ्ठलाने आवडीने गोळा केला
विठ्ठल बोल शेला कशानं फाटला
गेलो होतो बनामंदी तुळसी बेटाला गुंतला
पंढरची वाट कशानं काळी झाली
विठ्ठलाच्या माडीवर रूख्मिनी केस वाळी
अशा गाण्यातून पांडुरंगाचं आणि त्याला प्रिय असलेल्या तुळशीचं गुणगाण केलेले असते.
पावसाची गाणी ः
पाऊस भरपूर आला, तरच शेतकऱ्याचं जीनं. नाहीतर मरणही अवघड, अशी स्थिती असते. गर्भगिरीतील शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून असते. पावसाने उशिर केला, की शेतकरी परमेश्वराला साकडे घालतात. कुणी महादेवाला पाण्यात ठेवते, तर कुणी देवाला फुल लावतं; परंतु बहुतेक ठिकाणी गावाच्या शिवेवर जाऊन भजन करण्याची प्रथा आहे. हे काम पुरूष मंडळी करतात. आपल्या धन्याची पावसासाठी ही स्थिती पाहून महिला गप्प कशा बसतील. त्याही धोंडी (पाऊस) माघण्यासाठी घराबाहेर पडतात. शक्यतो सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महिला घोळक्याने प्रत्येक घरासमोर जातात. तेथे गाणे म्हटले जाते.
घरातील मालकीन या महिलांना थोडे धान्य देतात. तसेच 1-2 रूपयेही देतात. सर्व महिला गाणे म्हणत असताना संबंधित घरातील मालकीन त्यांच्या अंगावर पाणीही शिंपाडते, ही प्रथा अद्यापही चालू आहे. धोंडीचे गाणे फार मजेशिर आहे. ते पुढीलप्रमाणे ः
धोंडी बाई धोंडी
धोंडी गेल्या हटा
पाऊस आला मोठा
धोंडीच्या भाकरी भिजल्या
आमच्या कन्या शिजल्या
शिजू द्या बाई शिजू द्या
राळा पाणी पिकू द्या
मन दाणे विकू द्या
आभाळ भरलं पाण्यानी
कणग्या भरल्या दाण्यानी
असं हे धोंडीचं गाणं अत्यंत तालासुरात सर्व महिला म्हणतात. या वेळी म्हणण्यासाठी आणखी एक गाणं अत्यंत सुंदर आहे.
पडला पाऊस पडून हुसळला
भावाला झाल्या लेकी
बहिणी विसरला
पडतो पाऊस पडतो पुरवला
पिकू दे मुग राळा
बंधू माझा लेकुरवाळा
पडतो पाऊस वल्या झाल्यात जुमीनी
डोई भाकरीच्या पाट्या
शेता चालल्या कामिनी
ढग दिसतात; परंतु पाऊस काही येत नाही. या वेळी महिलांचा सूर जरा वेगळा असतो. रानात, आपल्या शेतात काम करीत असताना एक-दोन महिला एकत्र येऊन हळी देतात..
बरस रे मेघ राजा
दुणिया झाली तरसरे
आई चुकली लेकरा
गाय चुकली वासरा
हरण चुकली पाडसा
बरस रे मेघ राजा
अत्यंत भावपूर्ण असलेलेले हे गीत शेतकऱ्यांच्या अंतःकरणाची हाळी देऊन जाते.
भल्लरी ः
गर्भगिरी डोंगररांगेत सामुहिक गीत शक्यतो गवत कापणी, ज्वारी काढणीच्या वेळी गायले जाते. या गाण्यांना "भल्लरी' असं म्हणतात. या भल्लरीत देवाचं वर्णन, आपल्या लाडक्या बैलांचं वर्णन अत्यंत रोचक पद्धतीने दिले जाते. कौतुक केले जाते. ज्या वेळी इर्जिक असते. त्यावेळी सामुहिक गीत गाण्यासाठी शेतकऱ्यातील गायक हमखास जागा होतो. लोकगितांच्या ठेक्यावर विशेषतः महिलांच्या बहुतेक गाणी पाट असतात. त्या आपल्या बैलांचं कौतुक करताना म्हणतात..
हावस्या मोत्याची हितं जोडी हजाराची
जुपेव बाळ गाडी मला हावस बाजाराची
लाडकं मुल माझं आखरावरी झोपी गेलं
बैल बसू राजा यानी जागं केलं
श्रावण साखळी तुझ्या गळ्यामंदी लोळ
लाडकीबाई माझी बहिण भावामंदी खेळं
दोन्ही झाले बाळ दोन वाड्याची भिंत
लाडकी मैना माझी दरवाज्याला रंग देती
असं हे गाणं पुढं वाढतच जातं. गाणं गात असताना मात्र शेतकरी भरपूर काम करतो. तहान-भूक याची तमा नसते, हे मात्र खरे !

नाथ संप्रदायाची भूमी
नाथ संप्रदायाची भूमी
गर्भगिरी डोंगररांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे. नाथ संप्रदायाचा उदय व विकास याच पट्ट्यात झालेला आढळतो. राष्ट्रसंत तनपुरे महाराज, भगवानबाबा, भृंगऋषी, वामनभाऊ, गव्हाणेबाबा, खंडुजी बाबा आदी संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. गोरक्षनाथ गड (ता. नगर) ते डोंगरकिन्ही (ता. पाटोदा) या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी असलेली मोहटादेवी याच डोंगररांगच्या मनोऱ्यात विसावलेली आहे.
नाथ संप्रदायात या डोंगररांगेला विशेष महत्त्व आहे. गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला, असा उल्लेख पुरानातून आढळतो. पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील मच्छिंद्रनाथांची समाधी, येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांची समाधी (जानपीर), राणी मैनावतीची समाधी, शिरुर कासार तालुक्यातील मानूर येथील नागनाथ, मढी येथील कानिफनाथांची समाधी, नगर बीड मार्गावरील अडबंगीनाथ, तर गोरक्षनाथांचे वास्तव्य असलेला गोरक्षनाथ गड (ता. नगर) याच रांगेत आहेत. या डोंगरांत नवनाथ फिरले. राहिले. ठिकठिकाणी विसावले. त्यांच्या लिला, चमत्कार याच भागात झाले. त्यामुळेच नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरीचा उल्लेख आढळतो.
""तुये वेळेस कोणसोण तेथ। राहिले होते एकनाथ।
विचार करोनी उमाकांत । गर्भद्रिते राहिले ।।162।।
अदृश्य अस्त्र नगी पेरून । स्वस्थाना गेला कुबेर निघून ।
तेणे नगर तो कणक वर्ण । झाकोळोनी पायी गेला ।।163।।
परि गर्भद्रि पर्वतात । वस्तीस राहिला उमाकांत ।
तो अद्यापि आहे स्वस्थानात । म्हातारदेव म्हणती ।।164।।
तयाचिये पश्चिम दिशेशी । कानिफा राहिला शिष्य कटकेशी ।
वस्ती करूनी नाम या ग्रामसी । मढी ऐसे ठेविले ।।165।।
तयाचे दक्षिण पर्वथी । राहता झाला मत्स्येंद्र यती ।
त्याहुनी पूर्वेस महिपर्वती । जालिंदर राहिला ।।166।।
आणि त्या पर्वता पैलदेशी । नागनाथ राहिला वडवानळेशी ।
आणि रेवणसिद्ध तया । महिशी विटे ग्रामी ग्रामी गोरक्ष जती ।।167।।
वामतीर्थ गर्भाद्री पर्वती । राहाता झाला गोरक्ष जती ।
सेवेसी शिष्य टेऊनी सप्तों । विद्या सांगी गहिनी ते ।।169।।
या काव्यपंक्ती श्रीधर स्वामी यांनी त्यांच्या "नवनाथ ग्रंथ' या मूळ ग्रंथात तेविसाव्या अध्यात लिहून ठेवल्या आहेत. अकराव्या शतकात नाथ होऊन गेले असल्याचा त्यात उल्लेख आहे.
भगवान शंकर वृद्धेश्वर येथे राहिले. मत्स्येंद्रनाथ, कानिफनाथ, याच गर्भगिरीत मढी परिसरात पवित्र स्थानांत विसावले. राम-सीता वनवासात असताना याच भूमीत काही दिवस वास्तव्यास होते. त्यामुळे सीतेचे स्नानगृह डोंगरगण (ता. नगर) येथे आहे. मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ सोनई परिसराकडून येताना ज्या ठिकाणी थांबले, ते "वामतीर्थ' वांबोरी याच रांगेच्या पायथ्याशी आहे. तेथून ते डोंगरगणला रामेश्वर जवळ आले. तेथेच सीतेचे स्नानगृह आहे.
या निसर्गरम्य परिसरात त्यांचे वास्तव्य होते. संपूर्ण महाराष्ट्राला सीतेचे डोंगरगण परिचित आहे. त्याच डोंगरपट्ट्यात गुंजाळे (ता. राहुरी) येथील डोंगरात मावलायाचे कुंड आहेत. या कुंडात दुष्काळातही पाणी असते. निघोजजवळील रांजणखळग्यांशी साधर्म्य असणारे हे कुंड किती खोल आहेत, याबाबत कुणालाही माहिती नाही. गर्भगिरी डोंगररांगेसह हा सर्व परिसर दंडकारण्य म्हणून परिचित होता. दंडकारण्याचा उल्लेख पोथी-पुाणांमध्ये आढळतो. दंडकारण्य हे रामाची वनवासाची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याच भागातून शंकराचा अवतार असलेले काळभैरवनाथ सोनारीजवळ असलेल्या दैत्यांचा संहार करण्यासाठी गेले. जाताना ज्या ठिकाणी थांबले, ते आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे. भुतांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेले हे देवस्थान गर्भगिरीच्या कुशीत विसावलेले आहे.
याच डोंगरभागात गोमुख (पांढरीपूल), सीनाशंकर (ससेवाडी), बायजाबाई देवी (जेऊर), बहिरवाडीचा बहिरोबा, पिंपळगावची उज्जैनीमाता, बारा वर्षे फक्त लिंबाचा पाला व शेंगादाणे खाऊन तपश्चर्या केलेले आगडगाव रस्त्यावरील भृंगऋषी दऱ्यातील शेंगदाणेबाबा, संजीवनी गड, कापूरवाडीतील कानिफनाथ मंदिर, उदलमल घाटातील महादेव, ससेवाडीच्या डोंगरातील महादेवाचा दरा, सीना नदीचे उगमस्थान, आदी स्थाने दुर्लक्षित आहेत. पुढे बाळनाथ गड, करंजीच्या घाटातील गव्हाणेबाबांची समाधी, पाथर्डी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी असलेली दगडवाडीची अंबिका, तेथील राष्ट्रसंत तनपुरे महाराजांचे जन्मगाव असलेली भूमी, देवराईजवळील बालाजी मंदिर, मढी येथील कानिफनाथ देवस्थान, अशी देवस्थाने प्रसिद्ध आहेत.
च्या पुढे मोहटादेवी, तारकेश्वर गड, नागनाथ, गहिनीनाथ गड, अडबंगीनाथ गड, खरवंडी कासार येथील जनार्दन स्वामींची समाधी, धौम्यऋषी (भगवानगड), हरिहरेश्वर, समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली हनुमानाची मूर्ती जिथे आहे, ते हनुमान टाकळी, शंखाचे मंदिर असलेली जोहारवाडी, लोहसरचा भैरवनाथ, मिरीचा विरोबा ही देवस्थाने महत्त्वाची आहेत. या प्रत्येक देवस्थानाला वेगवेगळा इतिहास आहे. तेथील दंतकथा आहेत. जवळजवळ प्रत्येक ठिकाणी पाण्याची मुबलकता आढळते. देवींच्या ठिकाणी नवरात्रोत्सवात मोठ्या यात्रा भरतात. श्रद्धा, अंधश्रद्धाही सर्व ठिकाणी आहेत. साधारणतः मार्च-एप्रिल-मेच्या दरम्यान बहुतेक दैवतांच्या यात्रा भरतात. भैरवनाथ, बिरोबा, काळुबा, म्हसोबा आदी दैवतांच्या यात्रा याच काळात भरतात. अनेक ठिकाणी पशुहत्या होत असली, तरी आता अंधश्रद्धा कमी होत आहे. त्यामळे त्या बंद होऊ पाहत आहेत.
पुजाऱ्यांची परंपरा, यात्रेतील पुजेचा मान, काठ्यांचा मान काही विशिष्ट जाती, गावचे पूर्वीचे पाटील, विशिष्ट घराणी, गावे आहे. ही प्रथा अद्यापही पाळली जात आहे. एकूणच या डोंगरपट्ट्यातील गावांमध्ये धार्मिक वातावरण चांगले आहे. हरिनाम सप्ताहांच्या माध्यमातून कीर्तन, भजने आदी कायम चालू असतात.
गोरक्ष सिद्धांमध्ये उल्लेख आहे ः
""श्रावणमासी केला भंडारा दाटी सुरवरांची अपार।
गर्भगिरी की स्वर्ग कळेना देवता करिती विचार ।।''
यावरून या गर्भगिरी पर्वतांचे महत्त्व लक्षात येते.
श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात 40 अध्याय आहेत. त्यात एकूण 7600 ओव्या आहेत. ग्रंथाचा कर्ता धुंडिसूत मालुकवी हा श्रेष्ठ कवी आहे. तो नरहरी वंशातील श्रेष्ठ भक्त होता. शके 1741 मधील ज्येष्ठ महिन्यात शुद्ध प्रतिपदेला हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला, असे त्यात म्हटले आहे.
रामायण आणि महाभारताप्रमाणेच श्रीमद्भागवत हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. भागवताच्या अकराव्या स्कंधामध्ये निमिराजाशी नवनारायणांचे संवाद झाले आहेत. हे नवनारायण म्हणजेच ऋषभ देवांच्या शंभर पुत्रांपैकी देवाचे नऊ श्रेष्ठ भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने त्यांनी विविध अवतार घेतले.
स्वयंभू मनूचा पुत्र प्रियवृत्त, प्रियवृत्तचा पुत्र अग्निध, अग्निधचा पुत्र नाभी, नाभीचा पुत्र ऋषभदेव, ऋषभदेवाचे 100 पुत्र, त्यामध्ये सर्वात मोठा भरत. हा भरत मोठा पराक्रमी होता. त्याच्या नावावरूनच आपल्या देशाला भारत असे नाव पडले. भरत राजा झाला, तेव्हा त्याच्या बरोबर 9 भाऊ राज्यकारभार पाहू लागले. 81 भाऊ कर्मकांडी झाले. उरलेले 9 जण मात्र विश्व विख्यात तपस्वी मुनी झाले. त्यांनाच नवयोगेश्वर अथवा नवनारायण असे म्हणतात. हे नवही नारायण द्वारकापुरीत उपस्थित झाले. भगवान श्रीकृष्णासमोर आल्यानंतर तेथे भगवान श्रीकृष्णाने त्यांचे पुजन करून सिंहासनावर बसविले. त्यांनी श्रीकृष्णाला विचारले, "भगवान आमचे स्मरण करण्यामागचे प्रयोजन काय?' तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना, "तुम्ही कलीयुगात अवतार घेऊन योग विशिष्ट भक्तीचा प्रचार करा.' त्याप्रमाणे पुढील नऊ नारायणांनी नवनाथांचे अवतार घेतले.
नवनाथ म्हणजे नऊ नारायण होय.
1) मत्स्येंद्रनाथ (कविनारायण)
2) गोरक्षनाथ (हरी नारायण)
3) कानिफनाथ (प्रबुद्ध नारायण)
4) जालिंदरनाथ (अंतरिक्ष नारायण)
5) चर्पटीनाथ (विप्पलायन)
6) नागनाथ (अविर्होत्र नारायण)
7) भर्तरीनाथ (द्रुमील नारायण)
8) रेवणनाथ (चमस नारायण)
9) गहिनीनाथ (करभंजन नारायण)
कोणत्या नारायणाने कोणत्या ठिकाणी प्रगट व्हावे, याचा सविस्तर विचारही भविष्यपुराण या ग्रंथात सांगितलेला आहे. भगवान श्रीकृष्णाने ज्ञानेश्वर, शिवशंकराने निवृत्तीनाथ, ब्रह्मदेवाने सोपानदेव, अदिशक्तीने मुक्ताबाई, वाल्मिक ऋषींनी तुलसीदास, कुब्ज्यादासीने जनाबाई आदींच्य रुपात कलियुगात अवतार घेऊन कार्य करण्याचे नियोजन झाले. त्यानुसार एकामागून एक असे पवित्र कुळात अवतार झाले आहेत.
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ती दातार ।।1।।
विष्णुचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ।।2।।
ब्रह्मा सोपान तो झाला । भक्ता आनंद वर्तला ।।3।।
आदिशक्ती मुक्ताबाई । दासी जनी लागे पायी ।।4।।
या ओळी आहेत जनाबाईच्या गाथेतील. जनाबाईने याबाबत कथन केले आहे.
गर्भगिरी डोंगररांगेत नवनाथ सांप्रादाय वाढला. नाथांना आयुर्वेदाचे सखोल ज्ञान होते. त्यामुळे त्या शक्तीच्या आधारे व संजीवनी विद्येद्वारे त्यांनी सर्वसामान्यांवर औषधोपचार केले. गर्भगिरीतील औषधी वनस्पतींमुळे याच भागात नाथांनी अनेक काळ वास्तव्य केले.
नाथ संप्रदायात तीर्थटनाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक नाथांनी तप पूर्ण झाल्यानंतर तीर्थटन केलेले आहे. तीर्थाटनामागे त्या पवित्र स्थानांचे दर्शन घेणे हा मुख्य उद्देश असला, तरी समाजातील लोकांचे मानसिक, शारीरिक दुःखे दूर करणे हाही उद्देश असतो.
नाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष हे इतर संतांपेक्षा अधिक गूढ चरित्र्याचे होते. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये अधिक आकर्षण राहिले. अनेक भारतीय भाषांमधून लोककथा आणि लोकगीते रूढ झालेली आहेत. नवनाथांच्या प्रत्यक्ष काळानंतर सुमारे पाच ते सात शतकानंतर "नवनाथ भक्तिसार' या ग्रंथाचे लेखन झालेले आहे. त्यामुळे आधीच प्रचलित असलेल्या कथांच्या आधारांवर "नवनाथ भक्तिसार' हा ग्रंथ तयार झालेला आहे. त्यामध्ये 40 साव्या अध्यायात गर्भगिरी डोंगररांगेत नाथ राहिल्याचा उल्लेख आहे.
शके सत्राशे दहापर्यंत । प्रकटरुपें मिरवले नाथ ।।
येऊनी आपुले स्थानांत । गुप्तरुपें राहिले ।।94।।
राहिला कानिफा जती । उपरी मच्छिंद्रासी मायबाप म्हणती।
जानपीर जो जालंदर जती । गर्भगिरी नांदतसे ।।95।।
त्याहूनि खालता गैबीपीर । गहिनीनाथ परम सुंदर ।
वडवाळग्रामीं समाधिपर । नागनाथ असे की ।।96।।
वीटग्रामी मानवदेशांत । तेथे राहिले रेवणनाथ ।
चरपट चौरंगी अडभंगी तीर्थ । गुप्त अद्यापि करिताती ।।97।।
भर्तरी राहिला पाताळभुवनी । मीननाथ गेला स्वर्गालागोनी ।।
गिरनार पर्वती गोरक्षमुनी । दत्ताश्रमी राहिला ।।98।।
गोपीचंद आणि धर्मनाथ । ते स्वसामर्थे गेले वैकुंठात ।।
विमान पाठवोनि मैनावतीते । घेऊनी विष्णू गेलासे ।।99।।
पुढे चौऱ्याऐंशी सिद्धांपासून । नाथपंथ मिरवला अति सामर्थ्याने ।।
येथूनि चरित्र झालें संपूर्ण । सर्व नाथांचे महाराजा।।100।।
गर्भगिरीबरोबरच भारतात नाथ संप्रदायाची महत्त्वाची अनेक ठिकाणे आहेत. गोरक्षत्तोर काळी गोरक्षनाथांची मंदिरे सर्व भारतात उभारली गेली. अनेक मंदिरात मत्स्येंद्रनाथ, गुरूदेव दत्त, चौऱ्यांसी सिद्धांच्या मूर्ती दिसून येतात. याशिवाय नेवाळ ते रामेश्वरपर्यंत नाथांनी या सांप्रदायाची पताका फिरविली. मंदिर, मठ यांची स्थापना केली.
ज्या ठिकाणी नाथांची स्थाने आहेत. तेथे आजही अत्यंत महत्त्व आहे. योगी मठ (मोदिनीपूर), हिंगुआ मठ (जयपूर), योगी भवन (बागुडा), चंद्रनाथ (गोवा), गोरक्ष केंद्र (गोरखपूर), अंगना मंदिर (उदयपूर), आदिनाथ मंदिर (कलकत्ता), काद्री मठ (तामीळनाडू), गोरक्षतीर्थ (गिरीनार पर्वत, जुगरात), नीलकंठ महादेव (आग्रा), नोहर मठ (बिकानेर), पीरसोहर (जम्मू), भर्तृगुंफा (ग्वाल्हेर), महामंदिर मठ (जोधपूर), योगी गुहा (दिनजापूर), हांडीभरंगनाथ (म्हैसूर) आदी ठिकाणी नाथांची स्थाने प्रसिद्ध आहेत.
या बरोबरच बीड जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या हरंगुल येथे भर्तुहरीनाथांची भस्म समाधी आहे. या समाधीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शुक्रवारी तेथे समाधीला गायीच्या शेणापासून तयार केलेल्या भस्माचा लेप लावला जातो. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात रेणावी येथे रेवणनाथांचे मंदिर आहे. सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथे नागनाथांचे पुरातन मंदिर आहे. सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे गोरक्षनाथांचे प्रचीण मंदिर आहे. येथे पंचमीच्या दिवसी नागाची पूजा होते. सर्व नाथांपैकी कानिफनाथांचे असंख्य भक्त भारतभर विखुरलेले आहेत. त्यामुळेच मढी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथांच्या समाधीला विशेष महत्त्व आहे.
नाथ सांप्रायादायाशी संबंधीत पर्वत ः
ष्ट्रात नाथ सांप्रदायाशी नाते सांगणारे काही पर्वत आहेत. तेथे भक्तांचा ओढा कायम असतो. नगर जिल्ह्यातील हरिश्चंद्र गड हा सह्याद्रीच्या पर्वतातील एक महत्त्वाचा पर्वत आहे. या पर्वतावर पुरातन शिवमंदिर, लेणी आहेत. ते शक्तीपीठ म्हणून संबोधले जाते. याच गडावर योगी चांगदेवांचा मुक्काम होता. त्यांनी याच गडावर लिहिलेल्या "तत्त्वसार' या ग्रंथात हरिश्चंद्र गडाचा, मळगंगा प्रवाहाचा, केदारेस्वर मंदिर आणि शिवाच्या उपासणेत रमलेल्या सिद्धगणांचा उल्लेख आढळतो. आजही नाथपंतीय योगी गडावर येऊन भेटी देतात. या डोंगराच्या डाव्या बाजूला गोरक्षगड व सिद्धगड हे नाथांशी नाते सांगणारे गड आहेत.
नाशिकमधील त्रंबकेश्वर महत्त्वाचे आहे. तेथील ब्रह्मगिरी पर्वताच्या गुफेत गहिनीनाथांचे वास्तव्य होते. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना चुकून निवृत्तीनाथांनी या गुफेत प्रवेश केला. तेथे गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना उपदेश करून नाथपंथाची दीक्षा दिली, अशी कथा आहे.
अंजनी पर्वत हाही नाशिक जिल्ह्यात आहे. अंजनेरी गावाजवळील ब्रह्मगिरी पर्वताला लागूनच अंजनी पर्वत आहे. नवनाथ ग्रंथात उल्लेख केलेली काही सुर्यकुंडे येथे अजूनही दिसतात. नवनाथांनी या पर्वतावर असलेल्या सुर्यकुंडात स्नान करून मार्तंड पर्वतावरील नागवृक्षास अभिषेक केला. विशेष म्हणजे हनुमानाचा जन्म याच पर्वतावर झाला. त्यामुळेच अंजनीमाता व हनुमान मंदिर येथे पुरातन काळी उभारले आहे.
गिरीनार पर्वत हा गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात आहे. मत्स्येंद्रनाथ व गोरक्षनाथांना याच गिरीनार पर्वतावर गुरूदेव दत्तांनी उपदेश केला, असा ग्रंथांत वृत्तांत आहे. त्यामुळेच नाथपंथीय या गडाला नाथांचे शक्तीपीठ मानतात. गिरीनार हे दत्तक्षेत्र असून पर्वताच्या शिखरावर गुरूदेव दत्तात्रयांच्या पादुका आहेत. तेथेच गोरक्षनाथांचे मंदिर असून, अहोरात्र धुनी पेटलेली असते. नाथ भक्त आयुष्यात एकदा का होईना या तीर्थ क्षेत्राला भेट देतात.
शाबरी मंत्र ः
सांब नावाच्या ऋषीने साबरी विद्या जनकल्याणासाठी निर्माण केली. नवनाथांनी या विद्येत भर घातली. विशेषतः गोरक्षनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली. हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत. प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात.
नवनाथ (9 नारायण)
कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला. त्यावेळी विष्णूने नवनारायनांना बोलाविले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल. लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूने सांगितले. त्याप्रमाणे नवनारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारुपाला आले.
मत्स्येंद्रनाथ
"अरे हा कविनारायण ।
च्छोदरी पावला जनन।।
तरी मच्चेंद्र ऐसे याते नाम।
जगामाजी मिरवी की ।।33।।
(नवनाथ ग्रंथ अध्याय 1, ओवी 33 वी)
एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा, अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी, म्हणून यमुनातिरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कविनारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय? असा प्रश्न केला, तेव्हा कविनारायण मध्येच उत्तरला सगळं काही ब्रह्मस्वरुप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कविनारायण मासळीच्या पोटात आहेत.
शंकर म्हणाले, की तू अवतार घेतल्यावर बद्रीकाश्रमास ये. तेथे मी तुला दर्शन देईल. पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उबगले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूलबाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले, तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्माला म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्री राज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मिनीनाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुनातिरी आहे. त्यांची संजीवन समाधी सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे आहे. मायंबा म्हणूनही हे देवस्थान प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी नगर जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोडवरून देवराई फाट्यावरून वृद्धेश्वर, तेथून सावरगावला जाता येथे. मढीवरूनही वृद्धेश्वरला व पुढे मच्छिंद्रनाथ गडावर जाता येते.
गोरक्षनाथ
""तरी आता न लावी उशिर ।
हे गोरक्षनाथ निघे बाहेर ।।
ऐंसे वदता नाथ मच्छिंद्र ।।
बाळ शब्द उदेला ।।75।।
(अध्या 9 वा, ओवी 75)
मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला (सरस्वती) त्यांनी पूर्वी पूत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या, तर बाई तुझा मुलगा कुठे आहे, असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हणाल्या, मी भस्म दिले होते. ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मस्त्येंद्रनाथ गेले. "अलख निरंजन, हरि नारायणा बाहेर ये', असे म्हणताच उकिरड्यातून बारा वर्षांचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात (उकिरड्यात) जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान चंद्रगिरी (बंगाल) येथे आहे, तर संजीवन समाधी गिरनार पर्वत (सौराष्ट्र) येथे आहे. सौराष्ट्र काठेवाड प्रांतात जुनागड जिल्ह्यात गिरणार पर्वत आहे. राजटोकाहून जुनागड सुमारे 100 कि.मी. अंतरावर आहे. गिरणारहून द्वारकाधाम, सोरटी सोमनाथाला जाता येते. गिरणारच्या टोकावर गोरक्षनाथांचे लहान मंदिर आहे. तेथे काळ्या पाशानाची मूर्ती आहे. हा नेपाळ प्रांत आहे. तेथील हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळेच तेथील लोकांना गुरखा किंवा गोरखा म्हणत असावे.
नगर जिल्ह्यातील डोंगरगण (ता. नगर) जवळ गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली. येथे जाण्यासाठी नगर-औरंगाबाद रोडवरून शेंडी गावाच्या पुढे गेल्यावर डोंगरगणला जाता येते. तेथून 3 किलोमीटर अंतरावर हा गोरक्षनाथ गड आहे.
गहिनीनाथ
तेंगे करूनी पंचभूत।
दृश्यत्त्व पावले संजीवनी अर्थ।।
करभंजन ते संधीत ।
प्रेरक झाला जीवित्त्वा ।।61।।
(अध्याय 10, ओवी 61)
कनकगिरी गावात मस्त्येंद्रनाथाने गोरक्षनाथाला गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्रांचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा आम्हाला गाडी करून द्या, असे म्हणू लागले; परंतु बाबाने गाडी नाही करता येणार, असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायनाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला, ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राम्हणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्याच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. गहिनीनाथांचे जन्मस्थान कनकगिरी (जगन्नाथपुरी) येथे आहे. संजीवन समाधी चिंचोली (जि. बीड) येथे गहिनीनाथ गडाजवळ आहे. येथे जाण्यासाठी बीडहून आल्यास येवलवाडी (ता. पाटोदा) येथील जालिंदरनाथांचे दर्शन घेऊन डोंगरकिन्ही येथे जाऊन हातोला फाट्यामार्गे कुसळंब व तेथून चिंचोलीला जाता येते. नगरहून निघाल्यास नगर बीड रस्त्यावरून (अडबंगनाथ गड मार्गे) जाता येते.
जालिंदरनाथ
विप्रो हाते सलील बाळ ते जातें।
रक्षता स्पर्शता लागे हाते।।
दृष्टी पाहता बाळाने ।
ंजुळवत रुदन करी ।।112।।
(अध्याय 11 ओवी 112)
पांडवकुळात हस्तिनापूर ब्रहद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मुल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव "जालंदरनाथ' असे ठेवले. जालंदर नाथ या नावाचा अपभ्रंष होऊन पुढे जालिंदरनाथ हे नाव प्रसिद्ध झाले. त्यांनी पुढे नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तीनापूरमध्ये आहे. तर संजीवन समाधी येवलवाडी (ता. पाटोदा, जि. बिड) येथे आहे. येथे जाण्यासाठी पाथर्डी-बीड रस्त्यावरून रायमोहा गावापासून येवलवाडी व पुढे जालिंदरनाथांच्या समाधीस्थळी जाता येते.
कानिफनाथ
त्वरे येऊन कर्णदृसी।
दृष्टी पाहे ब्रह्मचारी ।
सहज करुनी उभयकरी ।।
नमस्कारी प्रेमाणे ।।115।।
(अध्यय 12 वा, ओवी 115)
बद्रीकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले हे पहा जालंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रब्रुद्धनारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ, तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रब्रुद्धनारायणा. तेव्हा एक सोळा वर्षाचा मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरीटंक (हिमालय) पर्वतावर आहे. संजीवन समाधी मढी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे आहे. येथे जाण्यासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरून तिसगावपासून मढीला जाता येते.
भर्तरीनाथ
भर्तरी भंगताचि बाळ त्यांत ।
तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त ।
तेही एकांग जाहले ।।27।। (अध्याय 24, ओवी 27)
भर्तरीनाथांच्या जन्माचे गुढ उकलले नाही. मात्र ग्रंथाल उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रमीलनारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला. ते म्हणजे भर्तरीनाथ. त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले. त्याला माणसांची भाषा शिकविली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंताची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे. तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे. येथे जाण्यासाठी गंगाखेड तालुक्यातून वडगाव फाट्यावर उतरून हरंगुलला जाता येते. बीड जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगपैकी परळी वैजनाथ- गंगाखेड रोडवरून वडगावफाट्यावरून जाता येते.
रेवणनाथ
पातला परी अकस्मात ।
येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत ।
बाळ दृष्टी देखिले ।।21।।
(अध्याय 34, ओवी 121)
ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्व संकेतानुसार चमसनारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहजसरुख नावाच्या कुणब्याने त्याला पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रयांनी त्याला महिमासिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे. येथे जाण्यासाठी विटे गावातून 10 कि.मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे. तेथेच हे देवस्थान आहे.
वटसिद्ध नागनाथ
असो वटवृक्ष पोखरांत ।
अंड राहिले दिवस बहूत ।।
अवि होत्र नारायण त्यांत ।
ईश्वर सत्ते संचारला ।।92।।
दिवसेंदिवस अंडात।
वाडी लागले जीववंत ।।
देह होता सामर्थ्यवंत ।
भगन लागे अंड ते ।।93।।
त्यांत तलवर पोखरांत ।
बाळ रुदन करी अत्यंत ।।
निढळवाणी कोण त्यांते ।
रक्षणाते नसेची ।।94।। (अध्याय 36, ओवी 92, 93, 94)
ब्रह्मदेवाचे वीर्य एका सर्पिणीने भक्ष केले. तीच्या पोटी अग्निहोत्र नारायणाने प्रवेश केला. अस्तिक ऋषिंच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोश धर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखविले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मला म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रयांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य येथे आहे. तर संजीवन समाधी वडवळ (ता. चाकूर, जि. लातूर) येथे आहे. येथे जाण्यासाठी लातूरवरून 25 कि.मी. अंतरावर चाकूर तालुक्यात वडवळ हे गाव आहे. हैद्राबाद - परळी रेल्वे मार्गावर हे तीर्थस्थान आहे.
चरपटीनाथ
या परी बहुता दिवशी । ईश्वर आता अवतार ।।
विप्पलायन त्या रेतासी । नारायण संचारला ।।21।।
(अध्याय 38, ओवी 21)
एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे दोन भाग झाले. एका भागाचे योगे साठ हजार वालखित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिप्पलायण यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहता होता. एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्याचे नावही "चरपटीनाथ' असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रयांनी त्याला अनुग्रह दिला. चर्पटीनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी मात्र नाही. कारण ते गुप्त रूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथांत आढळतो.
या नवनाथांबरोबरच मत्स्येंद्रनाथांचे चौरंगीनाथ, मीननाथ हे शिष्य आहेत. प्रत्येक नाथांचे शिष्य सिद्ध आहेत. त्यांची संख्या 84 आहे. या शिष्यांनाच 84 सिद्ध असे म्हणतात.
ऐतिहासिक माहिती
ऐतिहासिक माहिती
उंच.. उंच गगणाला भिडणारे डोंगरशिखर... गर्द वनराई... त्यात नितळ पाण्याचे खळाळणारे निर्झर... पक्षांचा किलबिलाट.. हरणांचे बागडणारे कळप... त्यात कोकिळेची मधूर कुहू-कुहू... पाखरांचे थवे जणू शाळा सुटून मुले घराकडे बागडताहेत... हिरव्यागार डोंगरावर थंड वाऱ्याच्या संगतीनं कुणाला भटकंती आवडणार नाही... हे सर्व मिळतं श्रावण महिन्यात गर्भगिरी डोंगरावर... तिनही ऋतुत गर्भगिरीत भ्रमंती चांगली वाटते.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवर ही डोंगररांग विस्तारली आहे. भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असलेले हे डोंगर आता पर्यटकांना खुणावू लागले आहेत. राम-सीता, नवनाथ, संत, महंत, आदिशक्ती यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीला जणू निसर्गाचं वरदान मिळाले आहे. निसर्ग भरभरून या डोंगराच्या पदरात दान टाकतो. पावसाळ्यात चांगला पाऊस होऊन ही भूमी हरित करतो. हिरव्यागार मखमलीची शाल पांघरून ही भूमी नववधूसारखी सजते ती पावसाळ्यात. या भूमीच्या या गोंडस अन् देखण्या रुपामुळेच आता लांबून पर्यटक या डोंगरांवर गर्दी करताना दिसतात.
या डोंगरांच्या अंगाखांद्यावर अनेक देवादिकांनी आपलं स्थान केले आहे. महंतांनी समाध्या घेतल्या. पूर्वीपासूनच फळा-फुलांनी बहरण्याच्या या गुणधर्मामुळेच राम-सीता या भूमीत राहिले. त्यामुळेच आता गर्भगिरी हे अधिक लोकांचे श्रद्धास्थान बनते आहे. नागमोडी वळणे घेत जाणारे घाट, या भूमीचे आभूषण झाले आहेत. उंच डोंगरांचे सोंडपे हे दागिना बनून पर्यटकांना खुनावत आहेत. गर्भगिरीची एकच मागणी आहे, ती म्हणजे एकदा तरी या भूमीच्या अंगाखांद्यावर खेळा... बागडा...
गर्भगिरीतील रहस्ये ः
निसर्गसौंदर्याची मुक्त उधळण असलेल्या, तसेच वनौषधी व वन्य जीवनाने समृद्ध अशा गर्भगिऱ्या कुशीत आतापर्यंत न उलगडलेले अनेक रहस्यमय पैलू आहेत. अनेक ऐतिहासिक घटनांची ही डोंगररांग साक्षीदार आहे.
कृष्णा व गोदावरी या दोन नद्यांच्या खोऱ्यांना जोडणारे हे डोंगर मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राच्या सीमारेषेवर आहेत. सह्याद्री पर्वताची एक पोटशाखा म्हणून ती ओळखली जाते. नगर-बीड जिल्ह्यातील डोंगररांग "गर्भगिरी' म्हणून ओळखली जाते. अगदी नवनाथांच्या पोथीतही गर्भगिरी असा उल्लेख आहे.
या डोंगररांगेतील शुद्ध हवा आरोग्यदायी आहे. भारताचे "सॅनेटोरिअम' म्हणून नगरचा उल्लेख ब्रिटिश सरसेनापती जनरल ऑकिनलेक यांनी केला होता. नगर शहरापासून जवळच असलेल्या कापूरवाडी तलावातील पाण्याने व कोरड्या हवामानामुळे श्वसनाचे विकार बरे होतात, असे पूर्वीपासून म्हटले जाते. हे पाणी गर्भगिरीचेच. संपूर्ण डोंगरात औषधी वनस्पती भरपूर प्रमाणात असल्याने हे शास्त्रीयदृष्ट्याही शक्य आहे. गर्भगिरीच्या या डोंगररांगेत अनेक रहस्यमय घडामोडी घडलेल्या आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी ः
अहमदनगर या ऐतिहासिक जिल्ह्यात गर्भगिरीच्या डोंगररांगेचा मोठा भाग आहे. त्यामुळे अनेक ऐतिहासिक घटना या गर्भगिरीने पाहिल्या आहेत. अनेक राजे अंगाखांद्यावर खेळवलेले आहेत. अनेक घटनांचे हे डोंगर साक्षीदार आहेत. निजामशाहीची राजधानी म्हणजे अहमदनगर शहर. पंधराव्या शतकाच्या अखेरीस, म्हणजे इ.स. 1486 मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाली. त्यानंतर फुटून निघालेल्या अहमदशहा बहिरी याने 28 मे 1490 रोजी नगर शहराची स्थापना केली. निजामशाही सन 1636 पर्यंत राहिली. याच काळात अहमदशहा, बुऱ्हाणशहा, सुलताना चांदबिबी आदींनी या भागात वास्तव्य केले. अनेक लढाया या डोंगराच्या कुशीत झाल्या.
गर्भगिरीतील शहा डोंगरावर चांदबिबीचा महाल या नगर जिल्ह्याच्या इतिहासातील मानाचा तुरा म्हणावा लागेल. नगर-पाथर्डी रस्त्यावरून नगरपासून 12 किलोमीटर अंतरावर ही तीन मजली इमारत नजरेत भरावी अशीच आहे. मर्तझा निजामशहाचा मंत्री सरदार सलाबतखान (दुसरा) याची येथे कबर आहे. सलाबतखानाचा मृत्यू सन 1589 मध्ये झाला. पण त्याने आपल्या हयातीत 1580 मध्ये ही वास्तू बांधली. महालाभोवती दगडी तट, तलाव आहेत. "दुर्बिण महाल' म्हणूनही या महालाचा उल्लेख आढळतो. ब्रिटिशांनी या वास्तूचा उपयोग सैनिकांसाठी आरोग्य धाम म्हणूनही केला होता. महालापासून जवळच वीरभद्रचे जुने मंदिर आहे. तेथे जंगम लोक राहतात. तेथून जवळच देवगावच्या डोंगरावर राडसबा महाल आहे. याचेही बांधकाम चांदबिबी महालाच्या काळात झाले असावे, उंचावर असलेला हा महाल एकांत व निसर्गसानिध्यात आहे. टेहळणीसाठी त्याचा उपयोग होत असे. ऐतिहासिक कलावंतीनीचा महाल याच रांगेत येतो.
गर्भगिरीच्या पायथ्याशी असलेल्या कापूरवाडीच्या तलावातून भिंगारला पाणीपुरवठा होत असे. याच भागात नगरला पाणीपुरवठा करणाऱ्या खापरी नळ योजनांचे अवशेष नळ अजूनही सापडतात. अहमद निजामशहाने सरदार इखत्यार खान, कासीम खान व सिद्धी मसशेरखान यांच्याकडून खापरी नळ तयार करून घेतला होता. या तलावाबरोबरच पिंपळगावचा तलाव सन 1913 ते 23 या काळात तयार झाला.
जेऊर परिसरातील डोंगरी भागातील पाणी या तलावात अडविले गेले आहे. पूर्वी नगर शहराला तेथून पाणीपुरवठा होत असे. गर्भगिरीवरील मांजरसुंबा गड ऐतिहासिक वास्तूचा एक आदर्श नमुना आहे. गोरक्षनाथ गडाजवळ हे स्थान आहे. निजामकालीन टेहळणी केंद्र तेथे होते. उंच डोंगरावर मोठा हौद, पाण्याची मोट हाकण्यासाठी केलेला चबुतरा, जुनी वास्तू, हे तेथील वैशिष्ट्य.
ऐतिहासिक भातोडीची लढाई गर्भगिरीच्या पायथ्यालाच झाली. तेथे असलेल्या शहाडोंगर, तसेच बारादरीच्या डोंगरपट्ट्यातील पाणी तलावात अडविले जाते. 1624 मध्ये शहाजीराजांनी येथील लढाईत मोठा पराक्रम गाजविला. शहाजीराजांचे भाऊ शरिफजी याच लढाईत कामी आले.
याच डोंगररांगेत असलेल्या मढीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज (पहिले) जेव्हा मोगलांच्या वेढ्यात सापडले, तेव्हा येसूबाईंनी मढी येथील कानिफनाथांना शाहू महाराजांच्या सुटकेसाठी नवस केला. त्यानंतर पाच दिवसांत त्यांची सुटका झाली. त्यामुळे नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई व शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बडोद्याचे सरदार पिलाजी गायकवाड यांनी आपला कारभारी चिमाजी सावंत मढीला पाठविला व तेथे महाद्वार, नगरखाना, सभामंडप, गौतमी बारव आदींचे बांधकाम झाले. मंदिरातील पितळी घोडा व सदोदित तेवणारा नंदादीप मराठे सरदार कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा बाबूराव आंग्रे यांनी दिला आहे. महिम भट्ट व चक्रधर स्वामी यांची भेट झालेले ठिकाण म्हणजे खरवंडी रस्त्यावरील तुळजवाडी (भेटीचा वड), संत एकनाथांनी गाढवाला पाणी पाजले ते खरवंडीतील महादेवाचे मंदिर परिसर याच परिसरात आहे.
याबरोबरच अनेक पौराणिक संदर्भ या डोंगररांगेत आहेत. महाभारतातील युद्धाच्या वेळी धुराळ्यामुळे हनुमानाचे तोंड काळे झाले होते. काळा मारुती हा करोडीला प्रसिद्ध आहे. अर्जुनाचा पुत्र बब्रुवाहन यांने अर्जुनाचा पराभव केला. त्यामुळे हताश होऊन अर्जुन रडला, ती भूमी म्हणजे पाथर्डीतील खोलेश्वराचे मंदिर. चांदबिबीच्या महालावरून दुलेचांदगावला केलेली पाइपलाइनचे अवशेष या परिसरात दृष्टी पडतात.
सोन्याचा गर्भगिरी
सोन्याचा गर्भगिरी
गर्भगिरी ही सह्याद्री डोंगररांगेची उपशाखा. नगर व बिड जिल्ह्याच्या दरम्यान विस्तारलेली ही डोंगररांग अत्यंत सुंदर आहे. मागील सात वर्षांपासून मी परिसराचा अभ्यास करीत आहे. गोरक्षनाथ गडापासून ते बीड जिल्ह्यातील डोंगरकिन्हीपर्यंत कधी एकटा, तर कधी स्थानिक लोकांना घेऊन माहिती जमा करू लागलो. जस-जशी माहिती मिळू लागली, तस-तशी अधिक खोलवर माहितीसाठी मी प्रयत्न करू लागलो. पुढे तर माहितीचा खजिनाच मिळू लागला.
नवीन माहिती मिळविण्यासाठी अनेक डोंगरांवर जावे लागले. एसटी बसने संबंधित गावात जायचे, अन् डोंगर चढायला सुरूवात करायची. माझ्या साप्ताहिक सुटीच्या दिवशी हा कार्यक्रम असायचा. सकाळी सात-आठ वाजता बाहेर पडलो, की संध्याकाळी परतायचे, असा माझा सुटीचा दिनक्रम असायचा. विविध माहिती मिळविण्यासाठी मी पूर्ण भारावून गेलो होतो. हे करीत असताना अनेक वेळा उंच डोंगरकड्यावरून घसरलो. हातापायांना जखमा झाल्या. दरोडेखोरांच्या गुहा शोध असताना, तर जीवानीशीच खेळ खेळावा लागला. भीती वाटायची, अन् ते ठिकाण सापडल्याचा आनंदही व्हायचा.
या निमित्ताने अनेक देवस्थाने लोकांसमोर आली. ही सर्व माहिती संकलित झाल्यानंतर नोव्हेंबर 2004 मध्ये "गर्भगिरीच्या कुशीत'या नावाने दै. सकाळमध्ये मालिका प्रसिद्ध झाली. त्यासाठी प्रत्येक भागाचे मी छायाचित्रे घेतलेली होती. नगर आणि औरंगाबाद- बीड आवृत्तीला ती प्रसिद्ध झाल्याने या डोंगराचे महत्त्व लोकांसमोर आले. तेथील स्थान, पर्यटन स्थळे, औषधी वनस्पतींचा सखोल अभ्यास झाल्यामुळे मालिका अधिक सुंदर व वाचणीय झाली. डोंगरांचा अभ्यास करीत असताना एखाद्या अवघड डोंगरात मी जेव्हा जाईल, तेव्हा गावातील अनेक लोकांना ते ठिकाणच माहिती नसल्याचे कळे. अर्थात त्या भागाकडे ज्यांचे शेत आहे, तीच मंडळी तिकडे जात होती. त्यामुळे संबंधित गावातील लोकही न गेलेल्या ठिकाणी मी जाऊन तेथील माहिती थेट लोकांपर्यंत आणल्याने "तूज आहे तूज पाशी, परी जागा विसरलाशी' अशी गत ग्रामस्थांची होऊ लागली.
ही माहिती घेत असताना काळू आणि कान्हू भिल्ल यांच्या कथा ऐकिवात येऊ लागल्या. ते नेमका कोण होते? कुठले होते? याची काहीच माहिती कुणी सांगू शकत नव्हते; परंतु त्यांच्या कथा मात्र अत्यंत रोचक होत्या. मी लहान असताना माझी आजी (कै.) यमुनाबाई या कायम दरोडेखोरांच्या कथा सांगत. त्यात काळू-कान्हूची कथा अधिक रोचक असे. पण ही फक्त कथा नसून सत्य घटना आहेत, हे मला नंतर कळले. त्यामुळे काळू-कान्हूचा शोध घेऊन दोघांचेही वंशज मी शोधू शकलो. हे दोघेही गरिबांचे दाता होते. त्यांची सखोल माहिती मी जमा केली आणि ती दै. सकाळमध्ये ऑगस्ट 2005 मध्ये प्रकाशित केली. माहिती खूप होती; परंतु मालिकेला मर्यादा असल्याने सर्व माहिती त्यावेळ प्रसिद्ध करू शकलो नाही. दरोडेखोरांची अत्यंत रोचक, थरारक अशी सखोल माहिती असलेल कादंबरी मी लिहिली आहे. ती लवकरच प्रकाशित होणार आहे.
डोंगरातील व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या महत्त्वाच्या देवस्थानांची, की ज्याचा या गर्भगिरीडोंगरांशी संबंध येतो, त्यांची माहिती कमीत कमी शब्दांत; परंतु पूर्णपणे येईल, अशा पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक देवस्थानांच्या वेगवेगळ्या दंत कथा असतात. त्याचीही सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला. काहींचे संदर्भ ग्रंथामध्ये सापडले, तर काही कथा फक्त लोकांच्या तोंडीच दिसतात. त्यामुळे त्यांचीही माहिती जास्त लोकांना भेटून एकवाक्यता घेण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांच्या म्हणण्यानुसार एखादी कथा थोडी वेगळीही असू शकते; परंतु मी जी जास्त लोकांच्या तोंडी होती, तीच घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी काळ-वेळ याचाही अभ्यास करावा लागला. "सकाळ'मध्ये मालिका प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक मित्रांनी, ग्रामस्थांनी याचे पुस्तक लिहिण्याचा आग्रह धरला. त्याचाच परिणाम म्हणून ही साहित्यकृती नाथांच्या चरणी अर्पण करून आपणांसमोर ठेवत आहे. आपणास हे पुस्तक भावेल, अशी खात्री वाटते. त्यात काही त्रुटी असतील, त्या आवर्जून कळवाव्यात. पुढील आवृत्तीत तशी सुधारणा करता येईल.
डोंगराच्या कुशीतील ग्रामस्थ अत्यंत चांगले आहेत. गरीब आहेत. कष्टाळू आहेत; परंतु त्यांना खरी गरज आहे, ती कामांची, उद्योगांची, हा डोंगर भाग म्हणजे निसर्गाचे सुंदर रुप आहे. तेथे वनश्री नटलेली असते. नाथ संप्रदाय वाढलेल्या या भूमीचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला, तर राज्यात नव्हे, देशात हा भाग प्रसिद्ध होईल. स्थानिक बांधवांना रोजगारही मिळू शकेल. खरे, तर यासाठीच हा भाग अधिक लोकांसमोर मांडण्याचा माझा प्रयत्न आहे. प्रत्येकाने एकदा तरी या भागाला आवश्य भेट द्यावी. पावसाळ्यात फुललेला निसर्ग म्हणजे मिनी महाबळेश्वरच आहे. डोळे भरून हा निसर्ग पहावा.
धन्यवाद.
- मुरलीधर कराळे
गुरुवार, १९ नोव्हेंबर, २००९
शनिवार, ७ नोव्हेंबर, २००९
गर्भगिरी
सह्याद्रीची उपशाखा असलेली गर्भगिरी ही डोंगररांग महाराष्ट्रात आहे. समुद्र सपाटीपासून २ हजार ते ३ हजार उंचीवर हे डोंगर आहेत. अहमदनगर, बीड जिल्ह्याच्या अंतगर्त असलेली व सुमारे २५० कि.मी. अंतरात वसलेली आहे.अत्यंत सुंदर असलेले हे डोंगर पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. याच डोंगररांगेत नवनाथ संप्रदाय वाढला. मढीतील कानिफनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, अडबंगीनाथ, काळ भैरवनाथ, मिनीनाथ आदी नाथांचे जागृत देवस्थाने या परिसरात आहेत. तसेच मोहटा देवी, आगडगावचे काळ भैरवनाथ, डोंगरगण येथील सितेची न्हाणी, मिरावली पहाड, तनपुरेबाबांचे जन्मस्थान असलेली दगडवाडी, असे अनेक देवस्थाने या डोंगरात आहेत. विविध आैषधी वनस्पती या डोंगरात आहेत. एतिहासिकदृष्ट्या ही रांग अत्यंत महत्त्वाची आहे. भातोडीची लढाई याच डोंगरांत झाली.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)